जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI Chairman Salary: भारतातील सर्वात मोठ्या बँकेच्या चेअरमनची सॅलरी किती? कोट्यवधी देतात का?

SBI Chairman Salary: भारतातील सर्वात मोठ्या बँकेच्या चेअरमनची सॅलरी किती? कोट्यवधी देतात का?

एसबीआय चेअरमन सॅलरी

एसबीआय चेअरमन सॅलरी

SBI Chairman Salary: एसबीआय बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. अशा वेळी त्याच्या चेअरमनचा पगार किती हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा पगार.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली,15 जून : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या अध्यक्षांना किती पगार मिळतो याचा तुम्ही कधी विचार केलाय? तुम्ही असा विचार करत असाल की त्यांना वर्षाला करोडो रुपयांचे पॅकेज मिळते, तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. SBI च्या वार्षिक रिपोर्टनुसार, बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांना आर्थिक वर्ष 2023 मध्ये बँकेकडून 37 लाख रुपये पगार मिळाला होता. गेल्या आर्थिक वर्षातील त्यांच्या पगारापेक्षा हे प्रमाण सुमारे 7.5 टक्के अधिक आहे. खारा यांच्या पगारात रु. 27 लाख मूळ पगार आणि रु. 9.99 लाख महागाई भत्त्याचा समावेश आहे.

News18लोकमत
News18लोकमत

भारतातील सर्वात मोठ्या बँकेच्या अध्यक्षांच्या पगाराची 2022 साली देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शशिधर जगदीशन यांनी घेतलेल्या एकूण पगार आणि भत्त्यांशी तुलना केली, तर एसबीआयच्या दिनेश खारा यांचा पगार काहीच नाही. 2022 च्या आर्थिक वर्षात बँकेने जगदीशला एकूण 6.51 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून दिले होते. त्याचप्रमाणे ICICI बँकेचे CEO संदीप बक्षी यांना 2022 मध्ये वार्षिक वेतन म्हणून 7.08 कोटी रुपये मिळाले. 2022 च्या आर्थिक वर्षात खाराने 34.42 लाख रुपये पगार घेतला. हे SBI चे पूर्वीचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आर्थिक वर्ष 2021 मध्ये घेतलेल्या पगारापेक्षा 13.4 टक्के जास्त होते.

Investment Tips : कमी वयात रिटायरमेंट घ्यायचीये? मग असा करा प्लान, होईल मोठी बचत

पीओपासून चेअरमन पदापर्यंत प्रवास

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दिनेश खारा 1984 मध्ये SBI मध्ये प्रोबेशन ऑफिसर (PO) म्हणून जॉईन झाले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले. याआधी त्यांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ग्लोबल बँकिंग आणि एसबीआय उपकंपन्यांचा कार्यभार सांभाळला होता.

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा खिसा होणार रिकामा

 मॅनेजिंग डायरेक्टरचा पगार वार्षिक 36 लाख एसबीआयच्या इतर अधिकाऱ्यांविषयी बोलायचं झालं तर मॅनेजिंग डायरेक्टर सीएस शेट्टी यांचा पगार दिनेश खारा यांच्या पगाराच्या जवळपासच होता. त्यांनी 26.3 लाख मूळ वेतन आणि 9.7 लाख महागाई भत्ता घेतला. बँकेच्या माजी एमडी अश्विनी भाटिया यांनी 31 मे 2022 पर्यंत सेवा दिली. त्यांना 5.7 लाख रुपये पगार देण्यात आला. भाटिया नंतर मार्केट रेग्युलेटर सेबीच्या फुल-टाइम सदस्य बनल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money18 , SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात