मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI ने सीनियर सिटीजनसाठी आणलीय खास योजना, चुटकीसरशी होणार काम

SBI ने सीनियर सिटीजनसाठी आणलीय खास योजना, चुटकीसरशी होणार काम

आता घरबसल्या तुम्हाला लाईफ सर्टिफिरेट कधीही कुठूनही बँकेत जमा करता येणार आहे.

आता घरबसल्या तुम्हाला लाईफ सर्टिफिरेट कधीही कुठूनही बँकेत जमा करता येणार आहे.

आता घरबसल्या तुम्हाला लाईफ सर्टिफिरेट कधीही कुठूनही बँकेत जमा करता येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: सीनियर सिटीजनसाठी वारंवार बँकेच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून SBI ने खूप चांगली योजना आपली आहे. आता घरबसल्या तुमची बरीचशी काम होणार आहेत. SBI ने महत्त्वाची माहिती ट्वीट करून दिली आहे. पेन्शनधारकांसाठी तर लाईफ सर्टिफिकेट जमा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याशिवाय पेन्शन मिळणार नाही.

आता घरबसल्या तुम्हाला लाईफ सर्टिफिरेट कधीही कुठूनही बँकेत जमा करता येणार आहे. व्हिडीओ कॉलद्वारे तुम्ही हे सर्टिफिकेट जमा करू शकता. ते कसं जमा करायचं याबाबत बँकेनं महत्त्वाची माहिती दिली आहे.

SBI ने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन व्हिडीओ कॉलद्वारे लाईफ सर्टिफिकेट जमा करणं हे अत्यंत सुरक्षित आणि सोपं आहे. पटकन जमा करता येतं. याशिवाय पेपरलेस आणि कोणतेही ज्यादा शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे तुम्ही घरबसल्या हे जमा करू शकता. तुम्हाला बँकेच्या फेऱ्या घालाव्या लागणार नाहीत.

व्वा! या 3 बँकांनी वाढवले FD वरचे व्याजदर, लगेच चेक करा तुमची बँक आहे का?

पेन्शन सेवा अॅप किंवा त्यांच्या वेबसाईटवरुन देखील तुम्ही लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. अवघ्या काही मिनिटांचं काम आहे. तुमचं लाईफ सर्टिफिकेट चुटकीसरशी जमा होणार आहे.

क्रेडिट कार्ड पेमेंट करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

आधी तुम्ही वेबसाईटला भेट द्या, किंवा अॅप डाऊनलोड करा. तिथे लॉगइन करा, त्यानंतर VLC प्रोसेस हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर लॉगइन आयडी आणि पासवर्ड अपलोड करा. SBI पेन्शन अकाउंट नंबर अपलोड करा. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP अपलोड करा.

तिथे अॅड अप्लिकेबल सर्टिफिकेट असा पर्याय येईल. टर्म आणि कंडिशन वाचून त्या एक्सेप्ट करा. तुमच्यासोबत पॅनकार्ड आणि आधारकार्ड ओरिजनल ठेवा. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून पुढची प्रक्रिया पूर्ण करा. अगदी सोपी आणि सहज होणारी ही प्रक्रिया आहे.

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi alert