मराठी बातम्या /बातम्या /मनी /क्रेडिट कार्ड पेमेंट करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

क्रेडिट कार्ड पेमेंट करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

क्रेडिट कार्डवर पेमेंट करुन EMI चा पर्याय निवडा तर तिथे तुम्हाला एक पर्याय मिळतो.

क्रेडिट कार्डवर पेमेंट करुन EMI चा पर्याय निवडा तर तिथे तुम्हाला एक पर्याय मिळतो.

क्रेडिट कार्डवर पेमेंट करुन EMI चा पर्याय निवडा तर तिथे तुम्हाला एक पर्याय मिळतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: क्रेडिट कार्डचा योग्य उपयोग केला तर आपल्याला फायदा होतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. त्याचा फायदा बँक आणि समोरच्या व्यक्तीला होत असतो. त्यामुळे तुम्ही नेहमी सतर्क आणि अलर्ट राहाणं गरजेचं आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याला पैसे कमी पडले की आपण सहज EMI वर गोष्टी घेतो. मात्र पेमेंट करताना अलर्ट राहायला हवं.

क्रेडिट कार्डवर पेमेंट करुन EMI चा पर्याय निवडा तर तिथे तुम्हाला एक पर्याय मिळतो. तुमच्या खात्यातून मिनिमम अमाउंट जावी की जेवढा EMI केला आहे तेवढी रक्कम जायला हवी. त्यामध्ये तुम्ही मिनिमम अमाउंटचा पर्याय निवडला असेल तर तुम्ही चूक करत आहेत. तुम्ही बँकेला जास्त पैसे भरता.

नेहमी EMI पेमेंट करताना टोटल अमाउंट भरणं अपेक्षित आहे. त्याचा फायदा असा की तुमचे पैसे वाचतात. आता हे कसं शक्य आहे त्यामागचं सिक्रेट काय आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे ते जाणून घेऊया.

Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी काय करायचं?

तुम्ही वेळेत पेमेंट करूनही तुम्हाला 35 ते 40 टक्के व्याज लावलं जातं. यामागचं कारण असं असतं की तुम्ही मिनिमम अमाउंट भरलेली असते. तुमचा जेवढा EMI आहे त्यापैकी तुम्ही केवळ 5 टक्के रक्कम भरत असता. त्यामुळे उरलेल्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला 35 ते 40 टक्के जास्तीचं व्याज लागतं.

नेमका काय फरक?

मिनिमम अमाउंटमध्ये तुमच्या EMI च्या 5 टक्के रक्कम खात्यातून वजा होते. त्यामुळे तुम्हाला जास्तीचा EMI भरावा लागतो. टोटल अमाउंट EMI भरला तर तुम्हाला जास्त पैसे भरावे लागत नाहीत. तुमचे जी रक्कम उरते त्यावर बँक ३० ते ४० टक्के अतिरिक्त व्याज बँक आकारते. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका.

खराब सिबिल स्कोअरमुळे लोन मिळत नाही; मग असा सुधारा

त्यामुळे वेळेत टोटल अमाउंट नेहमी भरा. मिनिमम अमाउंट पेमेंट करण्याचा फायदा एवढाच असतो की लेट फी लागत नाही आणि आपला सिबिल स्कोअरही चांगला राहातो. मात्र उर्वरित अमाउंटवर जास्तीचा व्याजदर लावला जातो. त्यामुळे ही चूक तुम्ही केली असेल तर आजच सुधारा.

First published:

Tags: Credit card, Credit card statements, EMI, Money