मराठी बातम्या /बातम्या /मनी /येत्या 1 फेब्रुवारीपासून 'या' बँकांच्या नियमात बदल, जास्त चार्ज भरावा लागणार; तुमचंही अकाऊंट आहे का?

येत्या 1 फेब्रुवारीपासून 'या' बँकांच्या नियमात बदल, जास्त चार्ज भरावा लागणार; तुमचंही अकाऊंट आहे का?

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊया.

मुंबई, 30 जानेवारी : तीन दिवसांनंतर म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांचे नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊया.

SBI चे हे नियम बदलणार

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांमध्‍ये मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं?

बँक ऑफ बडोदाचे नियम बदलणार

1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलणार आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टमचे (Positive Pay Syastem) पालन करावे लागणार आहे. म्हणजेच चेकशी संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर (cheque clearance) होईल. हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहे.

Retirement Planning : निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासणार नाही, असं करा आर्थिक नियोजन

पीएनबीने ग्राहकांसाठी नियम कडक

पंजाब नॅशनल बँक जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा गुंतवणूक फेल झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता.

First published:

Tags: Pnb bank, SBI, बँक