SBI देतंय स्वस्त घर आणि दुकान खरेदीची संधी, उरला अगदी कमी अवधी

SBI देतंय स्वस्त घर आणि दुकान खरेदीची संधी, उरला अगदी कमी अवधी

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' ने कर्ज न देणाऱ्या लोकांच्या व्यावसायिक आणि निवासी मालमत्तेचा लिलाव करायचं ठरवलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (State Bank of India)ने कर्ज न देणाऱ्या लोकांच्या व्यावसायिक आणि निवासी मालमत्तेचा (Residential and Commercial Property)लिलाव करायचं ठरवलं आहे. तुम्हाला जर व्यावसायिक मालमत्ता खरेदी करायची असेल तर ही चांगली संधी आहे. जेव्हा एखादा कर्जदार कर्ज बु़डवतो तेव्हा बँकांना ती मालमत्ता गहाण ठेवण्याचा किंवा मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा अधिकार असतो. बँक वेळोवेळी या रकमेची वसुली करण्यासाठी लिलाव करते.

बँक देते सगळी माहिती

अशा मालमत्तांच्या लिलावाच्या आधी त्याबद्दल वर्तमानपत्र किंवा आणखी काही पद्धतीने जाहिरात दिली जाते. जास्तीत जास्त लोकांनी या लिलावात भाग घ्यावा हा याचा उद्देश असतो. यामुळे ज्याला अशी मालमत्ता खरेदी करायची असते तो त्या मालमत्तेची माहिती घेऊ शकतो.

(हेही वाचा : Air India ची 'घुमो इंडिया' ऑफर, 799 रुपयांत काढा विमानाचं तिकीट)

State Bank of India

@TheOfficialSBI

Register for the SBI Mega E-Auction and get listed residential and commercial properties at unbelievable rates. The exclusive mega e-auction will be held on 26th February 2020. Register here: https://bank.sbi/web/sbi-in-the-news/auction-notices/mega-e-auction …#SBI #SBIMegaEAuction #BeABidder #ForeclosedProperties

बँकेच्या शाखेतून मिळेल पूर्ण माहिती

लिलावाच्या आधी दिलेल्या माहितीमध्ये संभाव्य खरेदीदाराला त्या मालमत्तेचा तपशीलही दिला जातो.या मालमत्तेच्या लिलावात भाग घेण्यासाठी लॉग इन पासवर्ड जनरेट केला जातो. बँक हा पासवर्ड ई मेलने पाठवते.

केव्हा होणार ई लिलाव?

तुम्हाला जर अशा प्रकारची व्यावसायिक किंवा निवासी मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही SBI ने दिलेल्या ट्वीटवर माहिती घेऊ शकता. SBI हा लिलाव 26 फेब्रुवारी 2020 ला करणार आहे.

===============================================================================================

First published: February 17, 2020, 2:18 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या