SBI अलर्ट! हे मोबाइल Apps ठरू शकतात तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी घातक, बँकेने दिला इशारा

SBI अलर्ट! हे मोबाइल Apps ठरू शकतात तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी घातक, बँकेने दिला इशारा

SBI ने ग्राहकांना त्यांच्या अलर्टमधून मोबाइल Apps संदर्भात इशारा दिला आहे. काही Apps फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. याकरता बँकेने ट्विटरच्या माध्यमातून काही टीप्स जारी केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुख्यत: बँकिंग संबंधितं गुन्ह्यांमध्ये  वाढ झाली आहे. अशावेळी प्रत्येक ग्राहकाने सजग राहणे आवश्यक आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI State Bank of India)ने त्यांच्या ग्राहकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांना वेळोवेळी सावधान करणाऱ्या बँकेने यावेळी App संदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे. बँँकेने त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. याआधी बँकेने बँकिंग व्हायरस संदर्भात अलर्ट पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले होते की Cerberus या मालवेअरच्या मदतीने खातेधारकांना निशाणा बनवण्यात येत आहे. या मालवेअरच्या मदतीने खातेधारकांना मेसेजच्या माध्यमातून फेक ऑफर्स सांगितल्या जातात आणि त्यांनी पाठवलेल्या बनावट लिंक्सवर क्लिक केल्यास ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असते.

(हे वाचा-रोज 7 रुपयांची बचत केल्यास मिळू शकेल 60 हजारांची पेन्शन, मोदी सरकारची खास योजना)

या मालवेअरच्या मदतीने तुमचा वैयक्तिक डेटा, म्हणजेच काही महत्त्वाचे पासवर्ड, डेबिट-क्रिडेट कार्ड डिटेल्स चोरी केले जाऊ शकतात. बँकेने ग्राहकांना नवीन अलर्टमधून मोबाइल Apps संदर्भात इशारा दिला आहे. काही Apps फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. याकरता बँकेने ट्विटरच्या माध्यमातून काही टीप्स जारी केल्या आहेत.

बँकेने दिलेल्या टिप्स

1) फोनमध्ये नेहमी अधिकृत Apps डाऊनलोड करा

2) अ‍ॅप्सना मोबाइलमधील permission देताना काळजी घ्या

3) अ‍ॅपमध्ये कार्डची माहिती सेव्ह करू नका

(हे वाचा-सोन्याचे भाव उतरले तर चांदी 530 रुपयांनी वधारली, वाचा काय आहेत दर)

4) एखादे अ‍ॅप डाऊनलोड करताना त्याचे Reviews तपासून घ्या

5) तुमच्या डिव्हाइसचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा

6) कोणतीही फ्री ऑफरच्या जाळ्यात फसू नका कारण त्यामुळे धोका वाढू शकतो

7) फॉरवर्डेड मेसेजमधून आलेल्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका

(हे वाचा-1 जूनपासून बदलणार रेशन कार्ड संबंधित अनेक नियम, वाचा सविस्तर)

8) तुम्ही आणि तुमच्या निवडीवर तुमची सुरक्षा अवलंबून आहे, त्यामुळे याबाबत निवड हुशारीने करा

First published: May 30, 2020, 12:56 PM IST

ताज्या बातम्या