Home /News /money /

SBI Alert : एसबीआयची ऑनलाईन सेवा उद्या बंद राहणार, वाचा सविस्तर माहिती

SBI Alert : एसबीआयची ऑनलाईन सेवा उद्या बंद राहणार, वाचा सविस्तर माहिती

SBI बँकेने बँकिंग सेवा सुधारण्यासाठी टेक्नोलॉजी अपग्रेड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी एसबीआयच्या ऑनलाइन सेवा 5 तासांसाठी बंद करण्यात आल्या होत्या.

    मुंबई, 21 डिसेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना उद्या म्हणजेच 22 जानेवारीला गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. हे बँकेच्या सेवांच्या टेक्निकल अपग्रेडशनमुळे होईल. 22 जानेवारीच्या रात्री 2 ते सकाळी 8.30 या वेळेत ग्राहकांना बँकेच्या ऑनलाइन सुविधा (SBI Online Service) वापरता येणार नाहीत. बँकेने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. SBI बँकेची इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking), योनो (YONO), योनो लाईट (YONO Lite), योनो बिझनेस (YONO Business) आणि UPI सेवा रात्री 2 ते सकाळी 8:30 पर्यंत ग्राहकांना उपलब्ध होणार नाहीत. Multibagger Share : 'या' शेअर्समुळे नव्या वर्षात गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस; 210 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स एसबीआयने ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की, आम्ही एक उत्कृष्ट बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत रहा. बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनुसार, SBI ग्राहक शनिवारी पहाटे इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सारख्या सेवा वापरू शकणार नाहीत. Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' सरकारी कंपनीतील हिस्सेदारी कमी केली, तुमच्याकडे आहे का? SBI बँकेने बँकिंग सेवा सुधारण्यासाठी टेक्नोलॉजी अपग्रेड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी एसबीआयच्या ऑनलाइन सेवा 5 तासांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. बँकिंग सेवा अधिक चांगली आणि सुरक्षित करण्यासाठी ही सेवा अपग्रेड करण्यात येत असल्याचेही बँकेने तेव्हा सांगितले होते. 11 डिसेंबर रोजी SBI च्या ऑनलाइन बँकिंग सेवा, YONO app, YONO Lite, YONO Business, UPI सेवा 5 तासांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: SBI, Sbi alert

    पुढील बातम्या