Home /News /money /

Multibagger Share : 'या' शेअर्समुळे नव्या वर्षात गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस; 210 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स

Multibagger Share : 'या' शेअर्समुळे नव्या वर्षात गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस; 210 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स

एकीकडे शेअर बाजारात घसरण होत असताना 15 शेअर आहेत ज्यांनी या वर्षाच्या 15 सत्रांमध्ये 210 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यामध्ये काही मायक्रोकॅप स्टॉक्सही आहेत.

    मुंबई, 21 जानेवारी : गेल्या काही सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे, परंतु या घसरणीच्या काळातही बीएसईच्या 15 शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. Ace Equity आणि BSE वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, असे 15 शेअर आहेत ज्यांनी या वर्षाच्या 15 सत्रांमध्ये 210 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यामध्ये काही मायक्रोकॅप स्टॉक्सही आहेत. यापैकी काही स्टॉक्सनी आता बाजारातील डॉली खन्ना यांसारख्या मोठ्या खेळाडूंनाही आकर्षित केले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, उत्कृष्ट परतावा देणार्‍या शेअर्सच्या यादीत KIFS फायनान्शियल सर्व्हिसेसचे (KIFS Financial Services) नाव अग्रस्थानी आहे. 31 डिसेंबर रोजी या शेअरचा दर 43.5 रुपये होता, जो शुक्रवार, 21 जानेवारीला 133.4 रुपयांवर गेला आहे. यानंतर AK Spintex चा क्रमांक लागतो. या कापड कंपनीचा (Textile Share) शेअर 31 डिसेंबर 2021 रोजी 27.95 रुपयांवर होता. तो आता 205 टक्क्यांनी वाढला आहे आणि आज तो 84.9 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, 2022 च्या सुरुवातीपासून, RTCL चा स्टॉक 166 टक्क्यांनी वाढला आहे, तर दौलत सिक्युरिटीजचा (Daulat Securities) शेअर 162 टक्क्यांवर गेला आहे. सचेता मेटल्सनेही (Sacheta Metals) आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे आणि या शेअरने वर्षाच्या सुरुवातीपासूनच 154 टक्क्यांनी झेप घेतली आहे. Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' सरकारी कंपनीतील हिस्सेदारी कमी केली, तुमच्याकडे आहे का? हे स्टॉक देखील 100-145 टक्के वाढले नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून ज्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे त्यामध्ये ट्रॅनवे टेक्नॉलॉजीज (Tranway Technologies), त्रिवेणी ग्लास (Triveni Glass), ओरोसिल स्मिथ्स (Orosil Smiths), केलटॉन टेक (Kellton Tech), बीसीएल एंटरप्रायझेस (BCL Enterprises), रुटोशॉ इंटरनॅशनल रेक्टिफायरचे (Ruttonsha International Rectifier) , टीना रबर अँड इन्फ्रा (Tinna rubber and infra) आणि शांती एज्युकेशनल आणि झोडियाक एनर्जी (Shanti Educational and Zodiac Energy) या शेअर्सचा समावेश आहे. प्रख्यात गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी डिसेंबर तिमाहीत टीना रबर आणि इन्फ्रा यांचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस खन्ना यांच्याकडे कंपनीचे 142,739 इक्विटी शेअर्स होते. या शेअर्समधून उत्कृष्ट परतावा भक्ती जेम्स (Bhakti James), बनास फायनान्स (Banas Finance), सिटीझन इन्फोलाइन (Citizen Infloline), गुजरात क्रेडिट कॉर्प (Gujrat Credit Corp), कटरे स्पिनिंग मिल्स (Katare Spinning Mills), स्विस मिलिटरी कन्झ्युमर गुड्स, आयएल अँड एफएस इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन, पोलो क्वीन इंडस्ट्रियल आणि टीन अॅग्रो या कंपन्यांच्या शेअर्सनीही गुंतवणूकदारांना चांगली कमाई दिली आहे. गेल्या 15 सत्रात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 95 ते 100 टक्के वाढ झाली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या