मुंबई, 11 डिसेंबर: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI Alert) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज शनिवारी SBI चे ग्राहक इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking Service) सेवा वापरू शकणार नाहीत. आज आणि उद्या बँका शनिवार आणि रविवार असल्याने बंद राहतील. महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारी बँकेला सुट्टी असल्याने बँका बंद असते. अशा स्थितीत तुमच्याकडे बँकेशी संबंधित जे काही काम असेल ते त्वरित ऑनलाइन (SBI Online Service) करून घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला त्यानंतर चिंता राहणार नाही.
एसबीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केले आहे बँकेने ग्राहकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी हे काम होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. या शेअर केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'आम्ही 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी रात्री 23:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत टेक्नॉलॉजी अपडेट करत आहोत, या दरम्यान INB/YONO/YONO lite/YONO Business/UPI उपलब्ध राहणार नाही. होणाऱ्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगीर आहोत आणि सहकार्य करण्याची विनंती करतो.'
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/LZsuqO2B0D
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 10, 2021
SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे
SBI च्या वेबसाइटनुसार, ही एक चतुर्थांश मार्केट शेअर असलेली देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने आपल्या 11 उपकंपन्यांद्वारे SBI जनरल इन्शुरन्स, SBI लाइफ इन्शुरन्स, SBI म्युच्युअल फंड, SBI कार्ड इत्यादीसारख्या विविध व्यवसायांमध्ये यशस्वीरित्या विविधता आणली आहे. जगभरातील 32 देश आणि 233 कार्यालयांद्वारे सर्व टाइम झोनमध्ये या बँकेची उपस्थिती आहे. SBI च्या देशभरात 22,000 पेक्षा जास्त शाखा आणि 57,889 पेक्षा जास्त ATM नेटवर्क आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI Bank News