नवी दिल्ली, 06 जुलै: तुमचे जर खाते देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची एक चूक तुमचं बँक खातं रिकामं करण्यास कारणीभूत ठरू शकते. बँकेने (SBI) ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. बँक खात्यातून Unauthorized transactions वाढत असल्याने बँकेने ही महत्त्वाची माहिती ग्राहकांबरोबर शेअर केली आहे.
एसबीआयच्या ग्राहकांना येणाऱ्या बनावट मेसेज संदर्भात बँकेने हे ट्वीट केलं आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीवर उत्तर देताना एसबीआयच्या अधिकृत अकाउंटवरून हे ट्वीट करण्यात आसं आहे. या बनावट मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ग्राहकाने @TheOfficialSBI आणि @Cybercellindia ला टॅग केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून याबाबत माहिती मिळवण्याकरता या ग्राहकाने ट्वीट केलं आहे. ग्राहकाला त्याचं एसबीआय खात 24 तासात ब्लॉक होईल असा मेसेज आला होता आणि ते टाळण्यासाठी एका क्रमांकावर त्वरित कॉल करण्याचं त्या मेसेजमधून नमुद करण्यात आलं होतं.
हे वाचा-ही सरकारी कंपनी देत आहे 2 कोटी जिंकण्याची संधी, या क्रमांकावर पाठवावा लागेल SMS
ग्राहकाने एसबीआयकडे केलेल्या तक्रारीची बँकेने घेतली आहे. बँकेने ही बाब बँकेच्या लक्षात आणून दिल्याबद्दल संबंधित ग्राहकाचं कौतुक देखील केलं आहे. बँकेने ग्राहकाला असं उत्तर दिलं आहे की, 'आम्ही असा सल्ला देतो की अशाप्रकारे बँकिंग डिटेल्स अर्थात युजर आयडी/पासवर्ड/डेबिट कार्ड क्रमांक/पिन/सीव्हीव्ही/ओटीपी बाबत विचारणा करणाऱ्या कोणत्याही इमेल/SMS/कॉल्स किंवा लिंक्सना कोणताही प्रतिसाद देऊ नका'.
Thanks for sharing the information, we appreciate your alertness. We advise our customers not to respond to emails/SMS/calls/embedded links asking them to share their personal or banking details like user ID/ Password/ Debit Card number/ PIN/ CVV/ OTP etc. Kindly share (1/2)
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 6, 2021
बँकेने आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, 'Phishing/Smishing/Vishing संदर्भातील तपशील report.phishing@sbi.co.in वर पाठवा. तुम्ही 155260 या हेल्पलाइन क्रमांकावर देखील कॉल करू शकता किंवा तुम्ही अशी घटना घडल्यास त्याबाबत रिपोर्ट करण्यासाठी स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थेशी संपर्क साधा.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.