मुंबई, 31 ऑगस्ट : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे आणि तिच्या स्थापनेला 67 वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला SBI च्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त 6,000 रुपये मिळवण्याचा मेसेज आला आहे का? अनेकांना हा मेसेज पाठवला जात आहे की एसबीआय आपल्या स्थापना दिनानिमित्त आपल्या करोडो खातेधारकांना पूर्ण 6,000 रुपये देत आहे. जर तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर तुम्हीही सावध व्हा. हा संदेश पूर्णपणे खोटा आहे.
एसबीआयने ट्वीट करून माहिती दिली
स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या ऑफर आणत असते. परंतु एसबीआयने आपल्या ग्राहकांना 6,000 रुपये देण्याची कोणतीही योजना सुरू केलेली नाही. ही योजना पूर्णपणे बोगस आहे. या प्रकरणी स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे की, अनेक सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली आहे. सबसिडी, फ्री ऑफर, फ्री गिफ्ट्स इत्यादी मार्गाने ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ऑफरचा फायदा घेण्यासाठी अनेक वेळा लोक त्यांचे बँक तपशील, वैयक्तिक माहिती शेअर करून ठगांच्या जाळ्यात अडकतात.
Beware of subsidies and free offers promised by fraudsters to dupe you. Stay alert and #BeSafeWithSBI.#CyberCriminals #Fraudsters #OnlineFraud pic.twitter.com/OoWN4urDYz
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 28, 2022
एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत? काय आहे सगळा प्रकार?
6 हजार रुपयांच्या नावाखाली फसवणूक
एसबीआयच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त बँक लोकांच्या खात्यात 6000 रुपये ट्रान्सफर करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 3 ते 4 प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर पैसे पाठवले जातील असं सांगितलं जातं. यानंतर ठग त्यांच्या खात्यातून त्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीसारखे बँकिंग तपशील विचारून सर्व पैसे काढून घेतात.
फसवणुकीला बळी पडल्यास तक्रार कुठे करावी
यापूर्वी, SBI ने देखील आपल्या ग्राहकांना पॅन कार्डच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीबद्दल इशारा दिला आहे. यासोबतच, बँक कोणत्याही प्रकारची लिंक पाठवून त्यावर पॅन तपशील अपडेट करण्यास सांगत नाही, असे सांगण्यात आले. यासोबतच, बँकेने असेही सांगितले आहे की, जर एखादी व्यक्ती सायबर गुन्ह्याचा बळी ठरली, तर अशा परिस्थितीत सायबर क्राईम सेलला 1930 या क्रमांकावर किंवा report.phishing@sbi.co या ईमेलद्वारे ही तक्रार करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money fraud, Online fraud, SBI