जाहिरात
मराठी बातम्या / मनी / करंट आणि सेविंग अकाउंटमध्ये काय फरक, किती उघडता येतात आणि काय फायदे?

करंट आणि सेविंग अकाउंटमध्ये काय फरक, किती उघडता येतात आणि काय फायदे?

Multiple Bank Account

Multiple Bank Account

करंट आणि सेविंग अकाउंटमध्ये काय फरक? तुम्हाला दोन्हीचे फायदे माहिती आहेत का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सध्या नोकरी असो की शिक्षण बँक खातं महत्त्वाचं आहेच. शाळेच्या स्कॉलरशिपचे पैसेही अगदी बँक खात्यावर येतात. त्यामुळे सध्या बँक खातं असणं खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सेविंग खातं आणि सॅलरी खात्यामध्ये नेमका काय फरक आहे? त्याचे फायदे आणि तोटे देखील समजून घेऊया. सेविंग आणि करंट दोन्ही खाती व्यवहार करण्यासाठीच वापरली जातात. मात्र ही दोन्ही खाती एकसारखी नाहीत. त्यामध्ये फरक आहे. तुम्ही सेविंग अकाउंटवर मिनिमम बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. बँकेच्या नियमानुसार ही रक्कम तुम्हाला खात्यावर ठेवणं बंधनकारक आहे. दोन्ही खात्याचा उद्देश वेगळा पैसे वाचवण्याच्या उद्देशाने किंवा नियमित व्यवहार करण्यासाठी लोक सेविंग अकाउंट उघडतात. करंट अकाउंटपेक्षा सेविंग खातं वेगळं आहे. करंट बँक अकाउंट अशा ग्राहकांसाठी आहे जे नियमितपणे मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार करतात. हे खास व्यावसायिकांसाठी बनवलं जातं. करंट अकाउंटवर कोणतंही व्याज मिळत नाही.

जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या ‘या’ गोष्टी

किती प्रकारचे असतात बँक खाती? नियमित बचत खाते, पगार खाते, शून्य शिल्लक खाते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष प्रकारची खाती इत्यादी ही फक्त बचत खाती आहेत. त्यांना 3 ते 6 टक्के व्याज मिळते.

News18लोकमत
News18लोकमत

हा नियम माहिती आहे का? सॅलरी खातं हे करंट अकाउंट असू शकतं. त्यामुळे ते झिरो बॅन्सवर उघडलं जातं. याशिवाय करंट अकाउंट हे झिरो बॅलन्सवर उघडलं जातं. याशिवाय त्यावर कोणतीही मिनिमम रक्कम ठेवण्याचं बंधन नाही. मात्र सेविंग अकाउंटसाठी मिनिमम रक्कम ठेवणं आवश्यक आहे.

विविध बँकांमध्ये अकाउंट असतील तर व्हा सावधान! होऊ शकते नुकसान

व्यावहारासाठी आहे मर्यादा? सेविंग अकाउंटमधून एका महिन्यात किती व्यवहार करता येतील यावर मर्यादा आहे. करंट अकाउंटला अशी मर्यादा नाही. सेविंग अकाउंटवर जास्तीत जास्त रक्कम ठेवण्यासाठी देखील मर्यादा आहेत. मात्र करंट अकाउंटला कोणतीही मर्यादा नाही. टॅक्सचे नियम करंट अकाउंट हे आयटीआरच्या अकत्यारित येत नाही. मात्र त्यावर आयकर विभागाची नजर मात्र असते. तर सेविंग अकाउंटवरील व्यवहार आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा लेखाजोखा तुम्हाला ITR मध्ये जोडावा लागतो. लॉकर फीमध्ये मिळते सूट अनेक बँका बचत बँक खात्यांवर जीवन आणि सामान्य विमा देतात. बचत बँक खाते असलेल्या खातेधारकांना लॉकर फीमध्ये 15 ते 30 टक्के सूट मिळते. बचत बँक खात्यातून तुम्ही सहज बिल भरू शकता.

बँक अकाउंट बंद पडलंय आणि त्यात पैसे अडकलेय? या ट्रिकने सहज काढता येईल अमाउंट

हे फायदे माहिती आहेत का? करंट अकाउंट ग्राहकाला ड्राफ्टद्वारे पैसे जमा करणे किंवा पाठवणे किंवा काढणं करणे खूप सोपे आहे. अनेक बँका करंट बँक अकाउंटवर डोअर स्टेप बँकिंग सुविधा देखील देतात. करंट बँक खाते असलेले अकाउंटरधारक देशभरातील त्यांच्या बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढू किंवा जमा करू शकतात. खातेधारकांना करंट बँक अकाउंटवर सहज कर्ज मिळते.

तुमच्या मुलांचे Bank Account सुरु करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

याशिवाय तुम्ही कितीही सेविंग काउंट उघडू शकता. तुम्हाला फक्त आयटीआर भरताना त्याची माहिती द्यावी लागते. करंट अकाउंट तुम्हाला दोनच उघडता येतात नाहीतर तुम्हाला त्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात