Home /News /money /

Sansera Engineering IPO: तुम्हाला कधी मिळणार हे शेअर्स? या सोप्या प्रोसेसने तपासा

Sansera Engineering IPO: तुम्हाला कधी मिळणार हे शेअर्स? या सोप्या प्रोसेसने तपासा

ऑटो कंपोनेंट बनवणारी कंपनी सॅन्सेरा इंजिनिअरिंग (Sansera Engineering IPO) चा आयपीओ 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान इश्यू करण्यात आला होता. इश्यूनंतर यामध्ये गुंतवणूक करणााऱ्यांना शेअर अलॉटमेंट तारखेची (Share allotment date) प्रतीक्षा आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: ऑटो कंपोनेंट बनवणारी कंपनी सॅन्सेरा इंजिनिअरिंग (Sansera Engineering IPO) चा आयपीओ 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान इश्यू करण्यात आला होता. इश्यूनंतर यामध्ये गुंतवणूक करणााऱ्यांना शेअर अलॉटमेंट तारखेची (Sansera Engineering IPO Share allotment date) प्रतीक्षा आहे. हे शेअर्स 21 सप्टेंबर रोजी जारी होण्याची शक्यता आहे. कंपनीने 1282.98 कोटी रुपयांचा आयपीओ जारी केला होता, जो 11.47 पट सबस्क्राइब झाला होता. मार्केट तज्ज्ञांच्या मते,  Sansera Engineeringचा आयपीओ बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा याच्या GMP (Grey Market Premium) मध्ये सुधार होत आहे. आज Sansera Engineering चा जीएमपी 38 रुपये आहे. जाणून घ्या कंपनीविषयी.. Sansera Engineering ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह सेक्टर्ससाठी काँप्लेक्स आणि क्रिटिकल प्रेसिशन इंजीनिअर्ड कंपोनेंट्स  तयार करते. सध्या कंपनीचे देशभरात 15 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. यापैकी 9 बंगळुरूमध्ये आहेत. याशिवाय कंपनीचे प्लांट्स कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये आहेत. या कंपनीचा एक प्लांट स्वीडनमध्ये देखील आहे. कंपनीचा 65 टक्के महसूल भारतातून येतो तर 35 टक्के इतर देशातून. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचं उत्पन्न वाढून 1,572.36 कोटी झालं होतं. नेट प्रॉफिटमध्ये  109.86 कोटींची वाढ झाली होती. हे वाचा-6 कोटी सदस्यांसाठी EPFO Alert! लक्षात ठेवा ही सूचना अन्यथा रिकामं होईल खातं BSE वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या -यानंतर Status of Issue Application असे एक पेज ओपन होईल. -यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा -त्यानंतर ज्या आयपीओची अलॉटमेंट तुम्हाला तपासायची आहे त्या कंपनीचे नाव निवडा -याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक,  DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा हे वाचा-Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव -यानंतर सर्च बटनवर क्लिक करा -यानंतर तुम्हाला I am not a robot च्या बॉक्सवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर व्हेरिफाय करा -सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Savings and investments

    पुढील बातम्या