नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: नोकरदार नेहमीचे खर्च भागवून थोडी बचत करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. त्याच्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात (Provident Fund Account) जमा होत असते. जी त्याला भविष्यात उपयोगी पडते. या रकमेबाबत त्याला खूप जागरुक रहावं लागतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) आपल्या 6 कोटी खातेदारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. जर तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर ही सूचना किंवा अर्लट (Epfo Alert) तुमच्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. ईपीएफओच्या खातेदारांची खासगी माहिती आणि इतर खासगी अॅप्लिकेशन्स यांच्या संदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून हा अलर्ट दिला आहे.
‘EPFO च्या वतीने फोन कॉल करून कधीही तुम्हाला UAN नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर किंवा बँक खात्याची माहिती विचारली जात नाही. ईपीएफओ कुठल्याच खातेदाराला फोन कॉल करत नाही,’ असं ट्वीट ईपीएफओने केलं आहे. ईपीएफओच्या नावाने खातेदारांना खोटे कॉल (beware of Falls Telephone Calls) करून त्यांची आर्थिक लूबाडणूक करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ईपीएफओने आपल्या खातेदारांना जागरूक करण्यासाठी हा अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर ईपीएफओच्या मूळ वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या वेबसाइटपासूनही सावध रहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.
#EPFO never asks it's members to share their personal details. Stay alert & beware of fraudsters.#ईपीएफओ कभी भी अपने सदस्यों से अपने व्यक्तिगत विवरण साझा करने के लिए नहीं कहता है। सतर्क रहें और धोखेबाजों से सावधान रहें।#SocialSecurity #PF #ईपीएफ #Employees #Services pic.twitter.com/83JiSpyT5C
— EPFO (@socialepfo) September 18, 2021
आपल्या खातेदारांना सावध करण्यासाठी ईपीएफओ कार्यालय नेहमी ट्विटर हँडल किंवा एसएमएसच्या माध्यमातून मेसेज पाठवत असते. त्याचाच भाग म्हणून हे ट्वीट केलं आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन करून आपल्या बँकेच्या किंवा पीएफच्या अकाउंटचे डिटेल्स मागितले जातात. त्याचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँक खात्याताली रक्कम काढून घेतली जाते अशी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
हे वाचा-Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव
कोविड-19 महामारीच्या काळात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे बँकिंग क्षेत्रातल्या घोटाळ्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं. आता डिजिटल आर्थिक व्यवहार पुष्कळ प्रमाणात वाढले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2018-19 या आर्थिक वर्षात 6800 आर्थिक घोटाळे (Bank Frauds) झाले असून त्यात 71 हजार 543 कोटी रुपयांची अफरातफर झाली. 2017-18 या आर्थिक वर्षात 5916 आर्थिक घोटाळे झाले असून त्यात 41 हजार 167 कोटी रुपयांची अफरातफर झाली. गेल्या 11 आर्थिक वर्षांमध्ये झालेल्या बँकिंग घोटाळ्यांची संख्या 53,334 असून त्यातून 2.05 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.