जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Accident Insurance : पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्स म्हणजे काय? कठीण काळात कसं करतं मदत?

Accident Insurance : पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्स म्हणजे काय? कठीण काळात कसं करतं मदत?

पर्सनल अॅक्सीडेंट इन्शुरन्स

पर्सनल अॅक्सीडेंट इन्शुरन्स

Accident Insurance : पर्सनल अपघात विमा एखाद्या व्यक्तीला अपघातामुळे होणार्‍या आर्थिक त्रासापासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरण्यास मदत होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : जीवनातील कठीण काळात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अनेक मार्गांनी प्रयत्न करत असते. यासाठी लोक अनेक प्रकारच्या पॉलिसी देखील घेतात. यांपैकी एक म्हणजे पर्सनल अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी म्हणजेच वैयक्तिक अपघात विमा. ही एक प्रकारची पॉलिसी आहे, जी अपघाती अपंगत्व किंवा मृत्यूमुळे झालेल्या आर्थिक नुकसानातून सावरण्यास मदत करते. यामध्ये अपघातामुळे शरीराचा कोणताही अवयव निकामी झाल्यास एकरकमी रक्कम दिली जाते.

News18लोकमत
News18लोकमत

वैयक्तिक अपघात विमा विविध प्रकारच्या अपघातांना कव्हर करतो. यामध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटापासून ते विजेचा शॉक लागणे, बाथरूममध्ये घसरणे, जिममध्ये व्यायाम करताना झालेली दुखापत, पाण्यात बुडूण्यापासून आगीमुळे होणारे नुकसान हे सर्व अपघात पर्सनल अ‍ॅक्सीडेंटमध्ये येतात. पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्सचा प्रिमिय याचा प्रीमियम कव्हर, रक्कम आणि व्यक्तीच्या नोकरीच्या श्रेणीवर अवलंबून असते. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नोकऱ्यांच्या तुलनेत उच्च जोखीम श्रेणीतील नोकऱ्यांमध्ये प्रीमियमची रक्कम जास्त असेल. तुम्हाला किती कव्हर हवे आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. साधारणपणे तुम्ही वार्षिक पगाराच्या 15-20 पट कव्हर घेतले पाहिजे. Term Insurance घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पॉलिसीधारकाचा झाला मृत्यू? नॉमिनीला पूर्ण पैसा मिळेल का? या पॉलिसीमध्ये अपंगत्वाची वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे यामध्ये व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यामुळे शरीरातील कोणत्याही एका महत्त्वाच्या अवयवाचे दीर्घकालीन आणि पूर्ण नुकसान होते. यामध्ये दोन्ही हात गमावणे, दोन्ही पाय गमावणे, पूर्ण अंधत्व, आवाज कमी होणे, मानसिक स्थिती कमी होणे यासारख्या परिस्थितींचा समावेश होतो. अशा परिस्थितीत, साधारणपणे विमा रकमेच्या 100% रक्कम दिली जाते. Train Insurance: रेल्वे देते फक्त 35 पैशांच इन्शुरन्स! पाहा अपघात झाल्यास किती लाख मिळतात? आंशिक अपंगत्वामध्ये एक हात किंवा एक पाय गमावणे. ऐकण्याची शक्ती कमी होणे, एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे, हात किंवा पायाचे बोटाला नुकसान होणे यासारखे अवयव किंवा शरीराचा काही भाग कायमचा गमवावा लागणे याचा समावेश आहे. या अंतर्गत विमा रकमेच्या काही टक्के रक्कम दिली जाते. तात्पुरते अपंगत्व जेव्हा एखादी व्यक्ती अपघातानंतर तात्पुरती अंथरुणाला खिळलेली असते, तेव्हा अपंगत्वाच्या काळात साप्ताहिक पेमेंट केले जाते. साधारणपणे विमा रकमेच्या 1 टक्के रक्कम दर आठवड्याला दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात