• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 1 ऑगस्टपासून पगार, pension आणि EMI पेमेंटसाठी लागू होणार नवा नियम, पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम

1 ऑगस्टपासून पगार, pension आणि EMI पेमेंटसाठी लागू होणार नवा नियम, पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम

आता कर्मचार्‍यांना सार्वजनिक सुट्टी आल्यानं पगार (Salary), पेन्शन (Pension) आणि ईएमआय पेमेंट्ससारख्या (EMI Payments) महत्त्वपूर्ण व्यवहारासाठी कामाच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता सुटीच्या दिवशीही ही कामं होणार आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 जुलै: पगारदार कर्मचाऱ्यांसाठी (Salaried Employee) रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) चांगली बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँकेने पगार होण्याच्या कालावधीत शनिवार, रविवार किंवा अन्य एखादी सार्वजनिक सुट्टी आल्यानं पगार (Salary) मिळण्यासाठी कर्मचार्‍यांना कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेतून त्यांची सुटका केली आहे. आता कर्मचार्‍यांना सार्वजनिक सुट्टी आल्यानं पगार (Salary), पेन्शन (Pension) आणि ईएमआय पेमेंट्ससारख्या (EMI Payments) महत्त्वपूर्ण व्यवहारासाठी कामाच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता सुटीच्या दिवशीही ही कामं होणार आहेत. याकरता रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात (National Automated Clearing House) ‘नॅच’च्या (NACH) नियमांत बदल केले असून, आता आठवडाभर या सेवा मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांची याबाबतीतील प्रतीक्षा कायमची संपली आहे. हे नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी गेल्या महिन्याच्या पतधोरण आढावा बैठकीत (RBI’s Monetary Policy) याची घोषणा केली होती. ‘नॅच’च्या सुविधेबाबत महत्त्वाचा निर्णय - साधारण दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचे पगार होतात. मात्र याच कालावधीत शनिवार, रविवार किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर पगारदार वर्गाला पगार खात्यात जमा होण्यासाठी सोमवारपर्यंत किंवा कामकाजाच्या दिवसापर्यंत (Working Days) थांबावं लागतं. मात्र आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्मचाऱ्यांची ही अडचण कायमस्वरुपी दूर केली आहे. बँकेने रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसचा (RTGS) लाभ आठवड्याचे सर्व दिवस करून देण्यासाठी बँकांमध्ये नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात ‘नॅच’संबंधी (NACH) नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आठवड्यातील सर्व दिवस RTGS सेवा ग्राहकांना उपलब्ध राहील. त्यामुळे आता सुटीच्या दिवशीही पगार आणि पेन्शन खात्यात जमा होऊ शकणार आहे, तसंच कर्जाचा हप्ताही दिला जाणार आहे. नोकरदार वर्गासाठी चांगली बातमी, या आठवड्यात PF खात्यात येईल अधिक रक्कम, असा तपासा बॅलेन्स काय आहे ‘नॅच’ सुविधा - नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात नॅच ही बल्क पेमेंट सिस्टम (Bulk Payment System) आहे. सर्व बँकांचं कामकाज या यंत्रणेद्वारे चालतं. ती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय-NPCI) चालवली जाते. बँकेतील आपल्या खात्यात जमा होणारा पगार, पेन्शन, लाभांश आणि व्याज यासह वीज, गॅस, टेलिफोन, पाणी इत्यादी बिलं, कर्ज ईएमआय, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा हप्ता यांचं पेमेंट करण्याची सुविधा याच यंत्रणेद्वारे दिली जाते. सुट्टीच्या दिवशीही सेवा उपलब्ध - आतापर्यंत या सर्व सुविधांचा लाभ सोमवार ते शुक्रवार म्हणजेच आठवड्यातील कामकाजांच्या दिवशीचा मिळत होता, पण आता आठवड्याच्या शेवटी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीदेखील या सुविधा मिळणार आहेत. 1 ऑगस्टपासून आठवड्याचे सर्व दिवस नॅचची सेवा उपलब्ध होणार आहे. याचा लाभ सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांनादेखील होणार आहे. कारण नॅचद्वारेच डिजिटल पद्धतीनं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) सेवा दिली जाते. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात (Corona Pandemic) तर गरजू व्यक्तींपर्यंत सरकारी अनुदान वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीनं पोहोचवण्यात याच यंत्रणेची मदत झाली आहे.
First published: