तुम्ही सिंगल आहात? वाईट कशाला वाटून घेता, एकटं असण्याचे हे आहेत अनोखे फायदे

तुम्ही सिंगल आहात? वाईट कशाला वाटून घेता, एकटं असण्याचे हे आहेत अनोखे फायदे

Benefits of Being Single: अनेकांना एकटं असणं हे नकोसं वाटतं. मात्र एकटं असण्याचे अनेक खास फायदे आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : हे खरंच आहे, की तुम्ही कुणाला तुमचा जोडीदार बनवून आयुष्य घालवलं तर खूप आनंद मिळतो. मात्र तुम्ही सिंगल म्हणजेच एकटं (living single life) राहिलात तर त्याचेही विविध फायदे (benefits) आहेत.

एकटेपणाबाबत तुम्ही तुमची दृष्टी थोडी बदलण्याची फक्त गरज आहे. असं कराल तर हरेक क्षणाचा तुम्हाला वेगळा आनंद घेता येईल. सिंगल आयुष्य जगताना अशा अनेक संधी तुम्हाला मिळतात ज्यातून तुम्ही जीवन जगण्याची अनोखी मजा (enjoyment) आणि इतरांना मिळणार नाहीत असे वेगळे अनुभव घेऊ शकता. तुम्हीही सिंगल आहात? मग जाणून घ्या हे फायदे

स्वतःसाठी मिळतो वेळ(me time)

सिंगल होण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे, की तुम्हाला स्वतःचा मोकळा वेळ खूप मिळतो. तुम्ही विविध छंद जोपासू शकता. वाचन, संगीत किंवा अजून काही. यातून मिळणारा आनंद खूप मौल्यवान असतो. मात्र यासाठी तुम्ही आवर्जून वेळ काढला पाहिजे.

तुम्ही आपल्या मर्जीचे मालक असता (control your life)

सिंगल असताना तुम्ही हवं ते हवं तेव्हा करू शकता. सतत आपल्या जोडीदाराला काय वाटेल, तो काय म्हणेल याचा विचार करण्याची गरज नाही. स्वतःच आयुष्य स्वतःला हवं तसं स्वतंत्रपणे जगता येणं खूप महत्त्वाचं आहे.

हेही वाचा- बायकोच्या कटकटीपासून वाचण्याची ट्रिक; हर्ष गोयंका यांनी शेअर केला VIDEO

स्वतःची नीट काळजी घ्या (look after yourself)

एखाद्याच्या सोबत राहताना अनेक जबाबदाऱ्या, औपचारिकता यांच्यावर लक्ष द्यावं लागतं. त्या पूर्ण कराव्या लागतात. अनेकदा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यातून चिडचिड होते. एकटं असताना या शक्यता उद्भवत नाहीत.

मित्रांसोबत वेळ घालवा

कुठलीच जबाबदारी नाही. काही रोकटोक नाही. सिंगल असण्याचा सर्वात मोठा फायदा हा, की तुम्ही मित्रांसोबत खूप वेळ धमाल करू शकता. कुठंही फिरायला जाऊ शकता.

हेही वाचा 'त्यांचं' प्रेम कचरावेचकांनी जपलं, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधली लग्नातली अंगठी

आत्मिक समाधान आणि सुख (mental satisfaction)

एकटं असताना निरर्थक नात्यांचं ओझं वहावं लागत नाही. कडवट नाती अनेकदा आयुष्याची चव बिघडवतात. मात्र एकटं असताना या नात्यांच्या औपचारिकता करण्याची गरज नसते. यातून तुम्ही मानसिक आणि आत्मिक पातळीवर समाधानी राहता.

Published by: News18 Desk
First published: February 24, 2021, 9:35 PM IST

ताज्या बातम्या