मुंबई, 29 ऑगस्ट : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाा आज 24 पैशांनी घसरून 80.11 रुपयांच्या विक्रमी पातळीवर आले. मागील ट्रेडिंग सत्रात रुपया 79.87 वर बंद झाला होता. यापूर्वी रुपयाची नीचांकी पातळी प्रति डॉलर 80.06 होती, जी गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये पोहोचली होती. 2022 वर्षात रुपयाची डॉलरच्या तुलनेत 7 टक्क्यांनी मोठी घसरण झाली आहे. फेड रिझर्व्हच्या प्रमुखांनी व्याजदराबाबत घेतलेल्या निर्णयाचा जगभरात परिणाम दिसत आहे. फेड रिझर्व्हच्या प्रमुखांनी यावेळी घाईघाईने निर्णय घेतल्याचे दिसते, असे विदेशी मुद्रा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केवळ 8 मिनिटांच्या भाषणात त्यांनी फक्त एकाच गोष्टीवर भर दिला की, जोपर्यंत महागाईचा दर 2 टक्क्यांवर येत नाही तोपर्यंत व्याजदर वाढतच राहतील. व्यवसाय आणि घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे आणि त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर दिसून येईल. यामुळेच आज अमेरिका, युरोप आणि आशियातील बहुतांश शेअर बाजार घसरत आहेत. PMJDY: रिकाम्या खात्यातूनही 10 हजार काढता येतात! 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान जन धन योजनेच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर डॉलर 20 वर्षांच्या उच्चांकावर जागतिक बाजारात केवळ भारतीय चलनच नाही तर युरो, पौंड यांसारख्या चलनांवरही प्रचंड दबाव असून त्यांचे दर विक्रमी नीचांकी पातळीवर गेले आहेत. यूएस डॉलर सध्या 20 वर्षांच्या उच्चांकावर आहे, तर आशियाई चलने आज 0.50 टक्क्यांनी घसरत आहेत. चीनचे चलन युआन हे 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे, तर भारतीय रुपया 79.70 ते 80.30 च्या दरम्यान व्यवहार करत आहे. Investment Tips: वाढत्या महागाईच्या काळात कशी करायची गुंतवणूक अन् बचत? या पाच टिप्स येतील कामी कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. एकीकडे ओपेकने उत्पादन कमी करण्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे, त्यामुळे क्रूड आयात करणे महाग होणार आहे. त्याचा परिणाम थेट आयात बिलावर दिसून येईल आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दबाव वाढेल. खाद्यतेल महागण्याची शक्यता भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करतो. आतंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची खरेदी ही डॉलरमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत जर रुपया कमजोर झाला तर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात. काही दिवसांपूर्वीच सरकारने खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी आयात शुल्क रद्द केले आहे. वैद्यकीय खर्च वाढू शकतो भारत मोठ्या प्रमाणात औषधांची देखील निर्यात करतो. सोबत औषध निर्मितीसाठीच्या मशिनरीज देखील भारत निर्यात करतो. यासाठी जर जास्तीचे पैसे मोजावे लागले तर याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे आणि वैद्यकीय खर्चासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. परदेशातील शिक्षण महागणार? रुपयाच्या घसरणीचा मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होऊ शकतो. भारतातून परदेशात गेलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने मुलांच्या पालकांना जास्त पैसे मुलांना आता पाठवावे लागणार आहेत. तसेच विदेशात फिरायला जाण्याचा कुणी विचार करत असेल आणि एक बजेट ठरवलं असेल तर त्या बजेटपेक्षा नक्कीच खर्च आता वाढणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.