जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PMJDY: रिकाम्या खात्यातूनही 10 हजार काढता येतात! 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान जन धन योजनेच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर

PMJDY: रिकाम्या खात्यातूनही 10 हजार काढता येतात! 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान जन धन योजनेच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर

PMJDY: रिकाम्या खात्यातूनही 10 हजार काढता येतात! 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान जन धन योजनेच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर

PMJDY: रिकाम्या खात्यातूनही 10 हजार काढता येतात! 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान जन धन योजनेच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर

Pradhan Mantri Jan Dhan Yojana: प्रधानमंत्री जन धन योजनेला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट: प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY - Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 46.25 कोटी लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. त्यामुळं गावाखेड्यातील अनेक लोकांनी बँकामध्ये आपली खाती उघडली आहेत. अनेक वर्षांपासून ज्या लोकांचा आणि बँकांचा दूर दूरपर्यंत संबधही नव्हता, असे अनेक नागरिक प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून बँकाशी जोडले गेले. देशातील सर्व घटकांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणं हा जन धन योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या मदतीनं केंद्र सरकारनं कोरोना महामारीच्या काळात गरिबांना पाठवलेली आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधीसह इतर योजनांतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. खेड्यापाड्यातील सावकार आणि सावकारांच्या जाळ्यात अडकलेल्या गरिबांना वाचवण्याचं कामही प्रधानमंत्री जन धन योजनेनं केलं आहे. आता सरकारनं गरिबांना दिलेली आर्थिक मदत मध्यस्थांकडे न जाता थेट त्यांच्या बँक खात्यात येते. पंतप्रधान जन धन योजनेतील उपलब्ध सुविधा-

  • बचत खात्यातील सर्व प्रौढ खातेधारकांना 10 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात आहे.
  • योजनेअंतर्गत निश्चित केलेली कमाल वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे.

हेही वाचा-  Investment Tips: वाढत्या महागाईच्या काळात कशी करायची गुंतवणूक अन् बचत? या पाच टिप्स येतील कामी

  • 2000 रुपयांपर्यंत बिनशर्त ओव्हरड्राफ्टला परवानगी आहे.
  • रुपे कार्ड विमा: प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत दिलेल्या रुपे कार्डवर मोफत अपघात विमा संरक्षण दिलं जात आहे, 28 ऑगस्ट 2018 नंतर खातेधारकांसाठी अपघात विमा संरक्षण 1 लाख वरून 2 लाख करण्यात आलं आहे.
  • 15 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2015 दरम्यान उघडलेल्या खात्यांच्या खातेधारकांना 30,000 रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिलं जात आहे, तर 1 लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण दिलं जात आहे.
  • योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये दोन वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार न झाल्यास खाते निष्क्रिय मानले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात