मुंबई, 28 ऑगस्ट: जगभरात महागाई झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळं वस्तू महागल्याचा परिणाम तुम्हालाही जाणवत असेल. महागाई वाढल्यानं तुमच्या बचतीचं मूल्य सतत कमी होत जातं. मध्यम स्तरातील महागाई अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर असल्याचं सांगितले जाते. महागाईचा उच्च स्तर हा ग्राहक म्हणून तुमच्यासाठी आणि इतर गुंतवणूकदारांसाठी खूप हानिकारक असतो. अर्थतज्ज्ञांच्या मते, आता काही दिवस महागाई उच्च पातळीवर राहील. अशा आव्हानात्मक काळात तुमच्या बचतीवरील उच्च महागाईचा प्रभाव कमी कसा करायचा याच्या काही टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
तुमचा वैयक्तिक महागाई दर मोजा-
तुम्ही एकाच प्रकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दोन वेगवेगळ्या दिवशी झालेल्या खर्चाच्या किंमतींची तुलना करू शकता. यासाठी, आजच्या काळात, तुमच्याकडे अनेक प्रगत मोबाइल अॅप्स किंवा साधनं आहेत, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या खर्चाची सहज गणना करू शकता आणि आज झालेल्या खर्चाची आदल्या दिवशीच्या खर्चाशी तुलना करून महागाईचा परिणाम समजून घेऊ शकता. तर, ग्राहक महागाई वैयक्तिक महागाईपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. ग्राहक चलनवाढीमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत 11-14 टक्के वाढ आणि भाड्यात घट यासारख्या सर्व खर्चांचा समावेश होतो आणि या सर्व खर्चातील वाढ तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवू शकते.
खर्च कमी करा-
महागाई उच्च पातळीवर असेल, तर अनावश्यक गोष्टींवर खर्च करणं टाळलं पाहिजे. हा देखील सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असेल, तर तुम्ही यासाठी तुमचे बँक किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पाहू शकता. जर महागाई शिखरावर असेल, तर तुम्ही खर्च कमी करण्यासाठी अतिशय लोकप्रिय 50:20:30 नियम देखील स्वीकारू शकता. या नियमानुसार, कर भरल्यानंतर उरलेल्या एकूण उत्पन्नापैकी 50 टक्के जीवनावश्यक गोष्टींवर, 30 टक्के इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि 20 टक्के बचत करावी. याशिवाय अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता.
रियल रिटर्न देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा-
अशा वेळी जेव्हा महागाई शिखरावर असते, तेव्हाच खरा परतावा मिळतो जेव्हा तुम्ही तुमच्या बचतीतून महागाई दराचा परिणाम कमी करू शकता. तथापि, तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि यासारख्या इतर योजनांवर अधिक चांगल्या परताव्याचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची बचत फक्त अशाच योजनांवर खर्च करावी ज्या तुम्हाला योग्य परताव्याची हमी देतात.
सर्वच गुंतवणुकीवर महागाईच्या उच्च पातळीचा परिणाम होत नाही-
जेव्हा महागाई शिगेला असते तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदरांमध्ये सुधारणा करते. त्यामुळे व्यवसाय आणि इतर क्षेत्र प्रभावित होतात. अशा स्थितीत तुमची बचत शेअर बाजार/कंपन्यांमध्ये गुंतवण्यापूर्वी त्या कंपनीचा व्यवसाय कसा चालला आहे ते तपासा. अनेक वेळा महागाईमुळे काही कंपन्यांच्या उत्पादनात किंवा ब्रँडमध्ये घट होते.
पगार वाढीची करा मागणी-
वस्तू महाग होत आहेत, सेवा महाग होत आहेत, त्यामुळे तुमचा खर्चही वाढेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पगारात निश्चितच वाढ करण्याची मागणी केली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.