मुंबई: नव्या वर्षात खऱ्या अर्थानं शेअर मार्केट मध्ये चांगले दिवस आले आहेत. रुपयाचं मूल्य वाढलं आहे. या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वाढलं आहे. पुन्हा एकदा रुपया 57 पैशांनी मजबूत झाला आहे. याचे चांगले परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आले आहेत. जागतिक पातळीवर मंदीचं सावट असतानाही भारतातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत मजबूत संकेतांमुळे भारतीय रुपयाला अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारला आहे. इंट्राडेला भारतीय रुपयात अमेरिकी डॉलरचे मूल्य घटून 82.07 वर पोहोचले. डॉलर इंडेक्स 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात रुपया 81.50 ते 81.70 पर्यंतही पोहोचू शकतो. रुपयात वाढ होण्याचे कारण काय याबद्दल जाणून घेऊया. दोन दिवसांत 90 पैशांनी रुपयाचं मूल्य वाढलं आहे. दोन ट्रेडिंग सेशनमध्ये रुपया एक रुपयाने वधारल्याचं दिसत आहे. दोन महिन्यात पहिल्यांदाच रुपयाचं मूल्य एवढं वाढलं आहे. डॉलर इंडेक्ट 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
उन्हाळ्यात बसणार महागाईचे चटके, पंख्यांच्या 20 टक्क्यांपर्यंत वाढणार किंमतीसर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 महिन्यांनंतर इंट्रा डेमध्ये सर्वात जास्त तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर मार्केटमध्ये मेटल सेक्टरचे स्टॉक्स कोसळले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर बड्या करन्सीमध्ये मजबूती आल्याचं पाहायला मिळालं आहे. युरो, युवान पाउंडचं मूल्य वधारलं आहे.
Mutual Funds : कोणत्या कारणांमुळे तुमची SIP मध्येच बंद होऊ शकते?फेडच्या वाढत्या व्याजदराच्या निर्णयामुळे डॉलर इंडेक्सवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे डॉलर नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कच्चा तेल हा महत्त्वाचा घटक आहे. ज्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात.