मुंबई: अलीकडच्या काळात, म्युच्युअल फंड विशेषत: इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हे लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये, विविध म्युच्युअल फंड योजनांतर्गत 6.04 कोटी एसआयपी खात्यांद्वारे 13 हजार 306 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र, काहीवेळा अशा परिस्थिती उद्भवतात ज्यामुळे एसआयपी रद्द होतो. खास करून जेव्हा बँक खात्यात निधीची कमतरता असते तेव्हा एसआयपी हमखास रद्द होतो. या परिस्थितीत एसआयपी रद्द होऊ शकते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एसआयपी हे एक चांगलं साधन आहे. भरपूर संपत्ती निर्माण करण्यात आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यात एसआयपी मदत करू शकते. अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की ज्यामुळे एसआयपी रद्द होण्याचा धोका निर्माण होतो. उत्पन्नातील घट, योजनांची खराब कामगिरी आणि बदलती आर्थिक उद्दिष्टे अशा कारणांमुळे एसआयपी रद्द होऊ शकते.
पहिल्यांदाच म्हाडाचं रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवाजेव्हा फंड हाऊस गुंतवणूकदाराच्या बँकेला एसआयपी डेबिट आदेश मंजूर करतो, तेव्हा गुंतवणूकदाराच्या बँक खात्यातून म्युच्युअल फंड हाऊसच्या बँक खात्यात विशिष्ट रक्कम हस्तांतरित केली जाते. पण, जर गुंतवणूकदाराकडे त्याच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसतील तर ही रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. परिणामी युनिट्सचं वाटप केलं जात नाही. नियमानुसार, पुरेशा निधीअभावी सलग तीन एसआयपी डेबिट न भरल्यास, एसआयपी रद्द केला जातो. पण, पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडानं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदाराच्या बँक खात्यातील अपुर्या पैशांमुळे सलग चार एसआयपी न भरले गेल्यास ते रद्द केले जातील. गुंतवणूकदारांना आणखी सवलत पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, या पूर्वी सलग तीन एसआयपी न भरल्यास ती रद्द केली गेली होती. मात्र, आता त्यांची संख्या वाढवून चार करण्यात आली आहे. गुंतवणुकदारासाठी हे अधिक फायदेशीर आहे कारण त्यांना अतिरिक्त महिना मिळतो.
तुम्हाला नोटेवर लिहिण्याची सवय, मग RBI चा हा नियम माहिती आहे का?जेव्हा निधीच्या कमतरतेमुळे एसआयपी पेमेंट पूर्ण होत नाही, तेव्हा गुंतवणूकदार त्या महिन्यात पुन्हा पेमेंट करू शकत नाही किंवा फंड हाउसला तशी विनंती करू शकत नाही. पैसे नसल्यामुळे गुंतवणूकदाराचं बँक खातं बंद होतं. अ शा परिस्थितीमध्ये डेबिट आदेशाची पूर्तता न झाल्यास, फंड हाऊस एसआयपी ताबडतोब रद्द करण्यास सुरुवात करतं. आणखी डेबिट आदेश अयशस्वी होण्याची फंड हाऊस वाट बघत नाही.
बँकेतील कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे एसआयपी न भरल्यास, समस्येचं निराकरण झाल्यानंतर पुढील व्यावसायिक दिवशी डेबिट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. निधीच्या कमतरतेमुळे एसआयपी न भरल्यास फंड हाऊस कोणताही दंड आकारत नाही. मात्र, ज्या बँकेत गुंतवणूकदाराचं बचत खातं आहे ती बँक विहित दंड आकारू शकते. दंडाची रक्कम बँकेनुसार बदलू शकते.