मुंबई, 10 मे : देश-विदेशातील प्रतिकूल घटनांच्या एकत्रित परिणामाने डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. प्रति डॉलर आणखी 60 पैशांच्या घसरगुंडीसह रुपयाचं मूल्य इतिहासात प्रथमच 77.50 वर जाऊन पोहोचलं आहे. विदेशी बाजारांमधून मिळणाऱ्या काही संकेतांमुळे रुपया कमजोर झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धासह रिझर्व बँक महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरांमध्ये वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे डॉलर वधारला आहे. शिवाय, चीनमधील कोरोना टाळेबंदी आणि तिचे मंदीसदृश आर्थिक परिणाम पाहायाला मिळत आहेत. 2008 साली एका डॉलरसाठी 43 रुपये मोजावे लागत होते. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत रुपयाच्याही खाली जाऊन पोहोचला आहे. यामुळे रुपयाची किंमत 0.02325 डॉलर वरून घटून 0.01298 डॉलरवर पोहोचली आहे. या स्थितीचा परिणाम भारतासह जगभरातील सर्वच चलनांवरती पाहायला मिळत आहे भारतासारख्या आयात मोठ्या प्रमाणात करणाऱ्या देशांसाठी देशाच्या चलनामध्ये झालेली ही घट अतिशय चिंतेची बाब आहे. कारण, यामुळे देशाला काहीही आयात करताना जास्त प्रमाणात किंमत अदा करावी लागेल आणि आयात महाग होईल. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, रुपया पुढील काळात आणखी कोसळण्याची शक्यता आहे ही बाब चिंतेची आहे. यामुळं डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी एक नीचांक प्रस्थापित करू शकतो. हे वाचा - LIC IPO चे वाटप कधी होणार? गुंतवणूकदारांना किती नफा होऊ शकतो? चेक करा डिटेल्स मागच्या 20 वर्षात डॉलर सर्वात जास्त वधारला रुपयामधील घसरणीचं मुख्य कारण डॉलर इंडेक्स मजबूत होणं हे आहे. सध्या हा इंडेक्स गेल्या 20 वर्षातला सर्वात जास्त वधारलेला आहे. डॉलर मजबूत होण्याच्या संकेतांमुळे परदेशी गुंतवणूकदार जगभरात खुल्या बाजारातून पैसा काढून घेऊन अमेरिकी सिक्युरिटीजमध्ये गुंतवत आहेत. यामुळे डॉलर मजबूत होत आहे. तर, या बाबीचा इतर देशातील चलनांवर उलटा परिणाम पाहायला मिळत आहे. डॉलर इंडेक्स जगभरातल्या प्रमुख 6 करन्सी युरो, येन पाउंड, डॉलर (कॅनडा), स्वीडिश क्रोना, स्विस फ्रँक यांच्या तुलनेत एका डॉलरची किंमत सांगतो. गुंतवणूकदारांनी यूएस बॉण्डमध्ये पैसा गुंतवणूक करण्यामुळे डॉलर मजबूत होत आहे आणि डॉलर इंडेक्स वाढत आहे. सध्या दर वाढण्याची शक्यता दिसत असल्यामुळे गुंतवणूकदार जोखमीच्या गुंतवणूकीचे पर्याय बाजूला ठेवून सिक्युरिटी मार्केटमध्ये पैसा गुंतवत आहेत. त्यामुळे डॉलरमध्ये मजबुती आणखी वाढेल. हे वाचा - शेअर बाजारात आजही घसरणीचे संकेत; काय आहेत कारणे? वाचा तज्ज्ञांचं मत रुपया कमजोर झाल्यामुळे काय होणार भारतावर परिणाम देशाचं चलन कमजोर झाल्यामुळे आयात महाग होते. जे देश आयातीवर अवलंबून असतात, त्यांना याचं मोठं नुकसान होतं. भारतात सध्या रुपयाच्या कमजोरीमुळे दुहेरी संकट आलं आहे. पहिलं असं की, कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत आणि देशाला डॉलर्समध्ये जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला रुपया कमजोर झाल्यामुळे देशाला इतरही बाबींसाठी आणखी जास्त डॉलर्स अदा करावे लागत आहेत. म्हणजेच, रुपया गडगडल्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याच्या आशा मावळू लागल्या आहेत. तसंच, आयात केलेल्या वस्तू अधिक महाग होतील. महागड्या डॉलरच्या माध्यमातून परदेशात शिक्षणाला जाणं, पर्यटन आणि परदेशातून कर्ज घेणं अधिक महाग होईल. तर, जे देश निर्यात अधिक प्रमाणात करतात, त्यांना या स्थितीचा फायदा होईल. फार्मा आणि आयटी सेक्टरला त्यांच्या सेवेसाठी आता रुपयांमध्ये जास्त रक्कम मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.