जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Rupees Vs Dollar: रुपयाची विक्रमी नीच्चांकी पातळीवर घसरण; काय आहे घसरणीचं कारण?

Rupees Vs Dollar: रुपयाची विक्रमी नीच्चांकी पातळीवर घसरण; काय आहे घसरणीचं कारण?

Rupees Vs Dollar: रुपयाची विक्रमी नीच्चांकी पातळीवर घसरण; काय आहे घसरणीचं कारण?

Rupee Down: याआधी गेल्या महिन्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत मागील सर्व विक्रम मोडीत काढले होते. तेव्हा एका डॉलरची किंमत 80.0650 रुपये होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट : डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ही आतापर्यंतची सर्वाधिक नीच्चांकी पातळी आहे. रुपयाच्या घसरणीचे प्रमुख कारण यूएस फेडच्या प्रमुखाने दिलेले दरवाढीचे संकेत हे आहे. यूएस फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी शुक्रवारी मध्यवर्ती बँकांसोबत झालेल्या बैठकीत महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर कमी करणे शक्य नसल्याचे सांगितले. या संकेतांनंतर रुपया आणखी कमजोर झाला. एका डॉलरची किंमत आता 80.11 रुपये झाली आहे. रुपया आज 19 पैशांच्या घसरणीसह उघडला आहे. यामध्ये तो प्रति डॉलर 80.07 च्या पातळीवर सुरू झाला, अशा प्रकारे तो 19 पैशांच्या घसरणीसह उघडला. रुपयाची मागील बंद पातळी प्रति डॉलर 79.88 रुपये होती. आज जागतिक शेअर बाजारातील चिंतेचा परिणाम जागतिक चलनावर तसेच भारतीय चलनावर होत आहे. Post Office Recurring Deposit: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त 100 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक, मिळतील 16 लाख रूपये याआधी गेल्या महिन्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत मागील सर्व विक्रम मोडीत काढले होते. तेव्हा एका डॉलरची किंमत 80.0650 रुपये होती. आजच्या घसरणीने मागील महिन्याचा विक्रमही मोडला आहे. Investment Tips: वाढत्या महागाईच्या काळात कशी करायची गुंतवणूक अन् बचत? या पाच टिप्स येतील कामी शेअर बाजारातही मोठी घसरण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्स 1466 अंकांच्या घसरणीसह उघडला. तर निफ्टी उघडताच 370 अंकांनी घसरला. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 1300 अंकांनी म्हणजेच 2.23 टक्के घसरून 57518 वर तर निफ्टी 385 अंकांनी म्हणजेच 2.22 टक्के घसरून 17179 वर होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात