तुम्ही रुपे कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आरबीआय ने कार्डबाबत मोठी घोषणा केलीये. आता कोणतीही बँक फॉरेक्स रुपे कार्ड जारी करू शकते. सोप्या शब्दात सांगायचे तर आता परदेशात जाताना रुपे कार्ड वापरता येणार आहे. आरबीआयच्या या पाऊलामुळे जागतिक बाजारपेठेत रुपे कार्ड वेगाने वाढेल.
फॉरेक्स-रुपे कार्ड हे एक प्रकारचा प्रीपेड कार्ड आहे. हे कार्ड खास अशा लोकांसाठी आहे जे परदेशात प्रवास करतात. हे कार्ड बिझनेसमन, परदेशात शिकणारे विद्यार्थी आणि विविध देशांत फिरणाऱ्या प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
RuPay एक इंडियन मल्टीनॅशनल फायनेंशियल सर्व्हिस पेमेंट नेटवर्क आहे. हे आरबीआयने 2012 मध्ये लॉन्च केले होते. भारतातील रिटेल पेमेंट्सना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे एक उपक्रम म्हणून याची सुरुवात करण्यात आली. रुपे ही कॅशलेस अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने सुरू करण्यात आली आहे. रुपे हा शब्द “रुपे” आणि “पेमेंट” या दोन मिळून बनला आहे.
रुपे डेबिट कार्ड हे एक प्लास्टिक कार्ड आहे, जे पेमेंट करण्यासाठी वापरले जाते. बँका त्यांच्या ग्राहकांना ही कार्ड देतात. हे पॉइंट ऑफ सेल (POS) डिव्हाइसेस, ऑटोमेटेड टेलर मशीन्स (ATM) आणि देशभरातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वापरले जाते. भारताने रुपेसह लोकल कार्ड फॅसिलिटीच्या माध्यमातून इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे.
रुपे डेबिट कार्ड बँकेद्वारे जारी केले जातात. या बँका ग्राहकांच्या पात्रतेनुसार विविध प्रकारची RuPay डेबिट कार्ड जारी करतात. याचा थेट फायदा ग्राहकांसोबतच बँकांनाही मिळतो.