मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Ayushman Bharat Yojana: आजारपणाची करू नका चिंता! सरकारच्या 'या' योजनेतून मिळतात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, असा करा अर्ज

Ayushman Bharat Yojana: आजारपणाची करू नका चिंता! सरकारच्या 'या' योजनेतून मिळतात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, असा करा अर्ज

Ayushman Bharat Yojana: आजारपणाची करू नका चिंता! सरकारच्या या योजनेतून 5 लाख रुपयांचे मोफत उपचार उपलब्ध, असा करा अर्ज

Ayushman Bharat Yojana: आजारपणाची करू नका चिंता! सरकारच्या या योजनेतून 5 लाख रुपयांचे मोफत उपचार उपलब्ध, असा करा अर्ज

Ayushman Bharat Yojana Benefits: प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना योजनेंतर्गत लोकांना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं. ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती.

    मुंबई, 28 जुलै: आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) आहे. या योजनेंतर्गत लोकांना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जात आहे. ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सरकारला देशभरातील 40 कोटी लोकांना विमा संरक्षण द्यायचं आहे. आयुष्मान भारत योजनेत तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करण्याचा पर्याय मिळतो. आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार - ही भारत सरकारची आरोग्य योजना असून या योजनेंतर्गत सरकार पात्र व्यक्तींना आयुष्मान गोल्डन कार्ड देत आहे. ही योजना विशेषतः गरीब लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्यांना आर्थिक दुर्बलतेमुळं मूलभूत आरोग्य सुविधा मिळू शकत नाहीत, अशा लोकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांनाही सहज उपचार मिळू शकतात. हेही वाचा- 5G Auction: सुपरस्पीड ते अब्जावधींची बोली, कसं असेल नव्या पिढीचं इंटरनेट? आयुष्यमान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी- तुम्हालाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल. यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे भेट देऊन तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी सहज अर्ज करू शकता. तथापि, आपण अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता तपासणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही आयुष्मान भारत योजनेत ऑफलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. आयुष्यमान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रांची करावी लागेल पूर्तता- आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडं काही कागदपत्रं असणं आवश्यक आहे. जर तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केली नसेल, तर अशा स्थितीत तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सर्व सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Private hospitals, Scheme, Serious diseases

    पुढील बातम्या