मराठी बातम्या /बातम्या /देश /

20 कोटींची रोकड, 3 किलो सोनं; ईडीच्या कारवाईत अर्पित मुखर्जींच्या घरात डोळे पांढरे करणारी संपत्ती जप्त

20 कोटींची रोकड, 3 किलो सोनं; ईडीच्या कारवाईत अर्पित मुखर्जींच्या घरात डोळे पांढरे करणारी संपत्ती जप्त

 ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून तीन किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. एवढे मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जाण्यासाठी ईडीने 20 ट्रंकही मागवले आहेत.

    कोलकाता, 28 जुलै : पश्चिम बंगालमध्ये अर्पिता मुखर्जी यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. पैशांचे ढीग या कारवाईत समोर येत आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी दुपारपासून ईडीचे पथक त्यांच्या दुसऱ्या घरी हजर असून तपास सुरू आहे. पहिल्या घराप्रमाणे येथेही मोठी रक्कम सापडली आहे. सापडलेली रक्कम मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याचे मशीन मागवले आहे. आतापर्यंत ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून तीन किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. एवढे मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जाण्यासाठी ईडीने 20 ट्रंकही मागवले आहेत. ईडीने अर्पिताच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापा टाकला आहे. अशी माहिती मिळाली की तिथेही रोख लपवून ठेवण्यात आली आहे. आता ईडीच्या तपासात तेथेही पुन्हा नोटांचा ढीग सापडला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने 45 कोटींची रोकड जप्त केली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. मागच्या छाप्यात अर्पिताच्या घरातून 20 हून अधिक फोन आणि अनेक कंपन्यांचे कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांनाही ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्यांची अनेक तास चौकशीही करण्यात आली आहे. अर्पिताच्या घरातून ईडीला एक डायरी मिळाली आहे. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च आणि शालेय शिक्षण विभागाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या डायरीत बऱ्याच नोंदी देखील आहेत. या डायरीतून या घोटाळ्याचे अनेक पैलू समोर येऊ शकतात. घोटाळा 1000 कोटींचा असल्याचा दावा घोटाळा उघड झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. पार्थ चॅटर्जीच्या अटकेने ममता यांची अडचण वाढली आहे. शिक्षक घोटाळा 40-50 कोटींचा नसून 1000 कोटींहून अधिकचा असल्याचा दावा भाजप नेते दिलीप घोष यांनी केला आहे. या घोटाळ्याविरोधात भाजप आज रॅली काढणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Mamata banerjee, West bangal

    पुढील बातम्या