मराठी बातम्या /बातम्या /मनी /Reliance चे ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये मोठं पाऊल, या दिग्गज ब्रिटिश कंपनीचं करणार अधिग्रहण

Reliance चे ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये मोठं पाऊल, या दिग्गज ब्रिटिश कंपनीचं करणार अधिग्रहण

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) सहाय्यक कंपनी, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडनं (Reliance New Energy Solar-RNESL) विस्तार योजनेअंतर्गत सोडियम-आयन सेल निर्माती कंपनी फॅराडियन लिमिटेडचं (Faradion Ltd) अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) सहाय्यक कंपनी, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडनं (Reliance New Energy Solar-RNESL) विस्तार योजनेअंतर्गत सोडियम-आयन सेल निर्माती कंपनी फॅराडियन लिमिटेडचं (Faradion Ltd) अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) सहाय्यक कंपनी, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडनं (Reliance New Energy Solar-RNESL) विस्तार योजनेअंतर्गत सोडियम-आयन सेल निर्माती कंपनी फॅराडियन लिमिटेडचं (Faradion Ltd) अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 31 डिसेंबर: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) सहाय्यक कंपनी, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडनं (Reliance New Energy Solar-RNESL) विस्तार योजनेअंतर्गत सोडियम-आयन सेल निर्माती कंपनी फॅराडियन लिमिटेडचं (Faradion Ltd) अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीसाठी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड 100 दशलक्ष ब्रिटिश पाउंड (GBP) इतकी किंमत देणार आहे. त्यानंतर फॅराडियन लिमिटेडवर आरएनईएसएलचा 100 टक्के मालकी हक्क प्रस्थापित होईल. याव्यतिरिक्त, आरएनईएसएल नवीन व्यवसायाच्या विस्तारासाठी भांडवल म्हणून 25 दशलक्ष ब्रिटिश पाउंडची गुंतवणूकदेखील करणार आहे.

    मूळची ब्रिटिश असलेली फॅराडियन कंपनी कित्येक दिवसांपासून भारतात उत्पादनाच्या संधी शोधत होती. फॅराडियन लिमिटेड ही सोडियम-आयन बॅटरी (sodium-ion battery) निर्मिती करणाऱ्या जगातील अव्वल उत्पादकांपैकी एक आहे. सोडियम-आयन बॅटरीचं तंत्रज्ञान लिथियम-आयन बॅटरीपेक्षा चांगल्या आहेत. या बॅटरीज जगभरातील ऑटोमोबाईल, स्टोरेज आणि मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवू शकतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

    हे वाचा-Gold Rate सोनेखरेदीआधी एका क्लिकवर वाचा लेटेस्ट भाव, आज सोन्यात पुन्हा तेजी

    भारतीय बाजारात मिळू शकतं महत्त्वाचं स्थान

    भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये (Indian automobile sector) आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. नागरिकांनीदेखील इलेक्ट्रिक वाहनाचं तंत्रज्ञान अतिशय सहज स्वीकारलं आहे. याशिवाय जगातील सर्वात मोठ्या मोबलिटी मार्केटमध्येसुद्धा (Mobility Market) भारताची गणना होते. त्यामुळे भारताच्या बदलत्या बाजारपेठेत नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. फॅराडियनचं सोडियम-आयन तंत्रज्ञान हे लिथियम-आयन आणि लीड-अ‍ॅसिड बॅटरीला सर्वात चांगला पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यामुळे सोडियम-आयन बॅटरी सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

    हे वाचा-तुमच्यावरील प्रचंड मोठ्या कर्जापासून सुटका हवीये? मग 'हे' उपाय घरघुती करून बघाच

    भारताची एनर्जी स्टोरेज क्षमता मजबूत आणि सुरक्षित होईल

    रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (CMD Mukesh Ambani) यांनी फॅराडियन लिमिटेडच्या संपादनाबाबत माहिती दिली आहे. 'आम्ही फॅराडियन आणि त्यांच्या अनुभवी टीमचं रिलायन्स फॅमिलीमध्ये स्वागत करतो,' अशा शब्दांत त्यांनी फॅराडियनचं भारतामध्ये स्वागत केलं आहे. फॅराडियननं विकसित केलेल्या सोडियम-आयन तंत्रज्ञानात सोडियमचा वापर केला जातो. त्यामुळे हे तंत्रज्ञान जगातील सर्वोच्च ऊर्जा साठवण क्षमता देतं. यामुळे भारताची एनर्जी स्टोरेज क्षमता आणखी मजबूत आणि सुरक्षित होईल, असं अंबानी म्हणाले. फॅराडियनसोबत काम करणं हे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र विकसित करण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टिनं एक मोठं पाऊल असेल, असा विश्वासही मुकेश अंबानींनी व्यक्त केला.

    (डिस्क्लेमर- नेटवर्क18 आणि TV18 कंपन्या चॅनल/वेबसाइटचे संचालन करतात, ज्याचे नियंत्रण स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)

    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance group, Reliance Industries