जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Rate Today: सोनेखरेदीआधी एका क्लिकवर वाचा लेटेस्ट भाव, आज सोन्यात पुन्हा तेजी

Gold Rate Today: सोनेखरेदीआधी एका क्लिकवर वाचा लेटेस्ट भाव, आज सोन्यात पुन्हा तेजी

Gold Rate Today: सोनेखरेदीआधी एका क्लिकवर वाचा लेटेस्ट भाव, आज सोन्यात पुन्हा तेजी

Gold and Silver Price Today on 31st December: वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळते आहे. सोन्यासह चांदीही आज महागली आहे. गेले काही दिवस या मौल्यवान धातूंचे दर उतरले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 डिसेंबर: सोने-चांदी खरेदी करणार (Investment in Gold and Silver) असाल तर सध्या तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. सोन्याचे दर काही दिवस कमी झाल्यानंतर आज शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. काल सोन्याचा दर 0.18 टक्क्यांनी घसरला होता. या घसरणीनंतर सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळावर होते. आज व्यवहारात तेजी आजच्या सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज सोनं 0.11 टक्क्यांनी महागलं आहे. तर चांदी आज 0.27 टक्क्यांच्या (Silver Rate on MCX) वाढीसह व्यवहार करत आहे. हे वाचा- Petrol-Diesel Price: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत सोन्याचा लेटेस्ट भाव फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX वर सोने सोने 0.11 टक्क्यांनी वाढून 47,940 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 62,330 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई48750 रुपये48760 रुपये
पुणे48,560 रुपये48,570 रुपये
नाशिक48,560 रुपये48,570 रुपये
नागपूर48750 रुपये48760 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई46750 रुपये46760 रुपये
पुणे46,040 रुपये46,050 रुपये
नाशिक46,040 रुपये46,050 रुपये
नागपूर46750 रुपये46760 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर

शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
मुंबई62200 रुपये61600 रुपये
पुणे62200 रुपये61600 रुपये
नाशिक62200 रुपये61600 रुपये
नागपूर62200 रुपये61600 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात