मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्यावरील प्रचंड मोठ्या कर्जापासून सुटका हवीये? मग 'हे' उपाय करून बघाच; होईल फायदा

तुमच्यावरील प्रचंड मोठ्या कर्जापासून सुटका हवीये? मग 'हे' उपाय करून बघाच; होईल फायदा

अशी मिळवा कर्जापासून मुक्तता

अशी मिळवा कर्जापासून मुक्तता

कर्जापासून मुक्ती मिळवण्याबाबत हिंदू धर्मशास्त्राने काही उपाय (Loan Tips ) सुचवले आहेत. तर ते उपाय (Ways to Get Out of Debt) कोणते हे जाणून घेऊया.

    मुंबई, 31 डिसेंबर: देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्याने सर्वच जण त्रस्त झाले आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा प्रतिकूल परिणाम सामाजिक, आर्थिक तसेच अन्य बाबींवर होत आहे. कोरोना महामारीमुळे (Coronavirus Pandemic) मोठे आर्थिक संकट ओढावलं आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यवसायांचे खूप नुकसान झाले आहे. अनेकांनी नाईलाजाने आर्थिक संकटाचा सामना (Solve Financial Problems ) करण्यासाठी कर्जाने (Debt) पैसे काढले आहेत. हे कर्जाचे पैसे फेडणे म्हणजे एक प्रकारचा मानसिक तणाव असतो. उद्भवलेल्या मानसिक तणावातून अनेक जण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. कर्जाचे जाळे हे भयानक असते. यात व्यक्ती गुरफटतच जात असतो. पण कर्जापासून मुक्ती मिळवण्याबाबत हिंदू धर्मशास्त्राने काही उपाय (Loan Tips ) सुचवले आहेत. तर ते उपाय (Ways to Get Out of Debt) कोणते हे जाणून घेऊया. याबाबतचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.

    कर्जापासून मुक्तता हवी असेल तर शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून गणेश स्तोत्राचे नियमित पठण करा. यामुळे कर्जातून लवकर सुटका होऊ शकते. तसेच आपल्या घराच्या ईशान्य दिशेकडील जागा स्वच्छ ठेवा. त्यामुळे वास्तू दोष दूर होतो आणि कर्जमुक्ती होण्यास मदत होते.

    EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा! 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination

    आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीला जननी म्हटलं जातं. बुधवारी मूग उकडावे आणि त्यात साखर, तूप मिसळून गाईला खाऊ घालावे. यामुळेही कर्जातून लवकर मुक्ती होते. याशिवाय, गूळ-हरभरा आणि केळी माकडांना, गायीला भाकरी, माशांना पिठाचे लहान-लहान गोळे, पक्ष्यांना धान्य खायला दिल्यानेही कर्ज फेडण्याला गती मिळते.

    कर्जातून मुक्ती मिळवण्याचा आणखी एक उपाय आहे. तो म्हणजे, रात्री झोपताना डोक्याजवळ एका भांड्यामध्ये गहू भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर आंघोळ करून ते गहू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करा. हे केल्याने घरातील पैशांसंबधित सर्व समस्या संपतात. तसेच कर्जापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते.

    शास्त्राअनुसार तुम्ही कर्ज घेतले आहे आणि ते फेडण्याचा प्रयत्न करत आहात, तर मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचा दूध आणि पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर मसूर अर्पण करा. तसेच तिथे बसून किमान एक जपमाळ ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

    कोरोना काळात लग्न थांबल्यास नो टेन्शन! ₹7500मध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचा विमा

    कर्जातून सुटका मिळवण्यासाठी दर मंगळवार आणि शनिवारी हनुमानाला तेल आणि पिवळ्या सिंदूर चढवा. तसेच हनुमान चालिसाचा पाठ करा. असे केल्याने कर्जाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि मनाला शांत लाभते. तर जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकला असाल तर या उपायांचा अवलंब करून त्यावर मात करू शकता.

    Link - https://www.aajtak.in/religion/news/story/tips-for-solve-money-problem-know-easy-way-to-get-rid-of-debt-tlifd-1372366-2021-12-18

    मयूरी

    First published:

    Tags: Loan, Money, Money debt, Tips