मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2035 पर्यंत Reliance बनणार नेट झिरो कार्बन कंपनी, मुकेश अंबानी यांची महत्त्वाची घोषणा

2035 पर्यंत Reliance बनणार नेट झिरो कार्बन कंपनी, मुकेश अंबानी यांची महत्त्वाची घोषणा

2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी (Net Zero Carbon Company) बनण्याचं उद्दिष्ट RIL ने ठेवलं असल्याचं अंबानी यांनी सांगितलं. ते आज (3 सप्टेंबर) इंटरनॅशनल क्लायमेट समिटमध्ये (International Climate Summit) बोलत होते.

2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी (Net Zero Carbon Company) बनण्याचं उद्दिष्ट RIL ने ठेवलं असल्याचं अंबानी यांनी सांगितलं. ते आज (3 सप्टेंबर) इंटरनॅशनल क्लायमेट समिटमध्ये (International Climate Summit) बोलत होते.

2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी (Net Zero Carbon Company) बनण्याचं उद्दिष्ट RIL ने ठेवलं असल्याचं अंबानी यांनी सांगितलं. ते आज (3 सप्टेंबर) इंटरनॅशनल क्लायमेट समिटमध्ये (International Climate Summit) बोलत होते.

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) हा सध्या जगापुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असून, त्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. तापमानवाढ कमी करण्यासाठी ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलं गेलं नाही, तर नजीकच्या भविष्यकाळात मानवजातीला गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावं लागणार असल्याचा इशारा दिला जात आहे. हरित ऊर्जेची निर्मिती (Green Energy) हा यावरचा एक महत्त्वाचा उपाय असून, या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited - RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी (Net Zero Carbon Company) बनण्याचं उद्दिष्ट RIL ने ठेवलं असल्याचं अंबानी यांनी सांगितलं. ते आज (3 सप्टेंबर) इंटरनॅशनल क्लायमेट समिटमध्ये (International Climate Summit) बोलत होते.

2030पर्यंत 100 GW एवढ्या अपारंपरिक ऊर्जेची (Renewable Energy) निर्मिती करणारे प्लांट्स उभारण्याचं लक्ष्य RIL ने ठरवलं आहे, असं अंबानी यांनी सांगितलं. आगामी काळात सौर ऊर्जानिर्मितीची (Solar Power) भूमिका महत्त्वपूर्ण असेल. पुरेसा साठा, स्मार्ट मीटरचा वापर यांचं सौर ऊर्जानिर्मितीला साह्य होईल. कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनची (Green Hydrogen) भूमिका महत्त्वपूर्ण असेल. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन कंपनी पुढचं नियोजन करत आहे, असं मुकेश अंबानी यांनी या परिषदेत सांगितलं.

हे वाचा-मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी गुंतवणार 75000 कोटी

'जीवाश्म इंधन (Fossil Energy) अर्थात खनिजतेल किंवा नैसर्गिक वायू आदींना ग्रीन हायड्रोजन हा उत्तम पर्याय आहे. आपल्याला स्वच्छ, हरित आणि नव्या ऊर्जेच्या युगात आलं पाहिजे. हवामानबदलाशी दोन हात करण्यासाठी हरित ऊर्जेचा वापर हाच एकमेव पर्याय आहे. हे लक्षात घेऊनच RIL हरित ऊर्जेच्या क्षेत्रात काम करत आहे. येत्या तीन वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं नियोजन RIL ने केलं आहे,' असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. ऊर्जानिर्मितीत भारत आत्मनिर्भर बनेल असा विश्वास व्यक्त करतानाच येत्या काही वर्षांत हायड्रोजनच्या किमती घटण्याची अपेक्षाही अंबानी यांनी व्यक्त केली.

हे वाचा-राज्यातील मंदिरे कधी खुली होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर

'या समिटमध्ये विचार मांडायला मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हवामानबदल हे साऱ्या जगासाठीच आव्हान आहे. ते नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हरित ऊर्जेच्या निर्मितीत आणि वापरात वेगाने वाढ करायला हवी. यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करायला हवं. या दृष्टीने भारत आपल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी सज्ज आहे. हरित ऊर्जेच्या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेला दृष्टिकोन हा जगासाठी पथदर्शक आहे. जीवाश्म इंधनावर देशाचा बराच मोठा खर्च होतो. म्हणूनच भारत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,' असं अंबानी यांनी नमूद केलं.

'भारतात नव्या हरितक्रांतीची (New Green Revolution) सुरुवात झाली आहे. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व (Global Leader) करण्याची क्षमता भारतात आहे,' असा विश्वासही अंबानी यांनी व्यक्त केला.

(डिस्क्लेमर- न्यूज18 लोकमत, रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग आहे. नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा मालकी हक्क रिलायन्स इंडस्ट्रीजकडेच आहे.)

First published:

Tags: Reliance Industries Limited, RIL