जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Inflation Rates : महागड्या भाज्यांनी बिघडवलं बजेट! जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81% वर पोहोचली, 3 महिन्यांतील उच्चांक

Inflation Rates : महागड्या भाज्यांनी बिघडवलं बजेट! जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81% वर पोहोचली, 3 महिन्यांतील उच्चांक

किरकोळ महागाई दर

किरकोळ महागाई दर

Retail Inflation Rates : जूनमध्ये महागाईचा दर वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाईचा दर जूनमध्ये 4.81 टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Retail Inflation Rates : जून महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, आले यासह खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ महागाईमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.81% या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तो मे मध्ये 4.31% होता. महत्त्वाचं म्हणजे खाद्यपदार्थांच्या किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 2.29 टक्क्यांवरून जूनमध्ये 4.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर पहिल्यांदाच वाढला आहे. सरकारने बुधवारी कंज्यूमर प्राइस इंडेक्स म्हणजेच CPI वर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर केली. मे महिन्यात किरकोळ महागाई 4.31 टक्के होती. तर एक वर्षापूर्वी जून 2022 मध्ये ती 7 टक्के होती. खाद्य उत्पादनांची महागाई 4.49 टक्के होती सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये खाद्य उत्पादनांची महागाई 4.49 टक्के राहिली. तर मेमध्ये ही 2.96 टक्के होती. सीपीआयमध्ये अन्न उत्पादनांचे वजन जवळपास निम्मे असते. Business Idea : लेमनग्रासच्या मागणीत मोठ्या प्रमाणात होतेय वाढ! शेती करुन करा बंपर कमाई महागाई दर RBI च्या 6 टक्क्यांच्या समाधानकारक स्तराच्या खाली आहे जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर वाढला असला तरी तो रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या खाली आहे. किरकोळ महागाई 2 ते 4 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी सरकारने रिझर्व्ह बँकेवर सोपवली आहे. रिझर्व्ह बँक किरकोळ चलनवाढीची आकडेवारी लक्षात घेऊन द्वि-मासिक चलनविषयक समीक्षा करते. Business Ideas: अमूलसोबत सुरु करा ‘हा’ बिझनेस, कमी गुंतवणुकीत होईल लाखोंची कमाई! RBI ने जूनमध्ये रेपो रेटमध्ये  कोणताही बदल केला नाही गेल्या महिन्याच्या चलनविषयक आढाव्यात रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट रेपो 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला होता. यासोबतच एप्रिल-जून तिमाहीत किरकोळ महागाई दर 4.6 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात