मुंबई, 26 एप्रिल: नवीन क्रेडिट (Credit Card) आणि डेबिट कार्ड (Debit Card) घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 21 एप्रिल 2022 रोजी क्रेडिट आणि डेबिट कार्ड देण्या संदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड कार्ड बंद करणं, बिलं तया करणं या बाबींशी संबंधित नवीन नियमांचा समावेश आहे. RBI च्या नवीन गाईडलाईन्स आणि त्यातील तरतुदी भारतात कार्यरत असलेल्या प्रत्येक शेड्यूल्ड बँकेला आणि सर्व नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांना (NBFCs) लागू होतील. हे नियम 1 जुलै 2022 पासून लागू होतील. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या क्रेडिट कार्ड बिलिंगशी संबंधित काय बदल होतील, ते जाणून घेऊयात. क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल बिलिंग सायकल हा असा कालावधी असतो, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड बिल जनरेट होतं. तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit Card Statement) दर महिन्याच्या 10 तारखेला जनरेट होत असल्यास, तुमची बिलिंग सायकल मागील महिन्याच्या 11 तारखेला सुरू होईल आणि चालू महिन्याच्या 10 तारखेला संपेल. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. लवकर कर्जमुक्त व्हायचंय? काय आहे प्रीपेमेंट सिस्टम समजून घ्या बिलिंग स्टेटमेंट लवकर मिळणार ग्राहकांना बिलं किंवा स्टेटमेंट लगेच पाठवली आहे, याची खात्री कार्ड वितरित करणाऱ्या कंपन्यांनी करावी. शिवाय ईमेल वेळेत पाठवले आहेत, याचीही पडताळणी करावी आणि ग्राहकाकडे पुरेसे दिवस आहेत याची खात्री करावी. यावर व्याज आकारण्यापूर्वी किमान 15 दिवसांचा कालावधी असावा, हे निश्चित करावं. दरम्यान, उशिरा इनव्हॉइसिंगच्या तक्रारी टाळण्यासाठी, कार्ड वितरित करणाऱ्या कंपन्या कार्डधारकाच्या संमतीने इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे (Mobile Banking) बिलं आणि खाते स्टेटमेंट जारी करण्याची ऑफर द्यावी. कार्ड वितरित करणाऱ्या कंपन्यांनी कार्डधारकाला बिलिंग स्टेटमेंट प्राप्त झाले आहे, याची खात्री करण्यासाठी एक सिस्टम निर्माण केली पाहिजे, असं आरबीआयने सांगितलं. तक्रारींचं उत्तर 30 दिवसांत मिळणार बिल चुकीचं जनरेट झालं नाही, याची खात्री कार्ड वितरित करणाऱ्या कंपन्यांनी करायला हवी. कार्डधारकाने बिलवर आक्षेप घेतल्यास कार्ड वितरित करणाऱ्यांनी त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल किंवा गरज भासल्यास तक्रारीच्या तारखेपासून पुढील 30 दिवसांत कार्डधारकाला पुरावा म्हणून कागदपत्रं जमा करावे लागतील. दरम्यान, प्रकरण वाढल्यास ते निकाली निघेपर्यंत कोणताही शुल्क आकारलं जाऊ नये. बिलिंग सायकल बदलण्याचा पर्याय सर्व क्रेडिट कार्ड धारकांसाठी, कार्ड वितरण करणाऱ्या कंपन्यांनी सामान्य बिलिंग सायकल पाळण्याची गरज नाही. या झोनमध्ये, कार्डधारकांना त्यांच्या पसंतीनुसार क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल बदलण्यासाठी वन टाईम ऑप्शन दिला जाईल. शेअर बाजारात ‘ही’ चूक टाळा, Zerodha चे ऐका आणि सुरक्षित रहा
7 दिवसांत क्रेडिट कार्ड बंद न केल्यास दंडाची तरतूद
नवीन नियमानुसार, जर एखाद्या ग्राहकाला त्याचे क्रेडिट कार्ड बंद करायचे असेल तर तो क्लोजर रिक्वेस्ट करेल. यानंतर क्रेडिट कार्ड कंपनीने सात वर्किंग डेमध्ये ते कार्ड बंद करणं आवश्यक आहे. असं न केल्यास, त्यांना ग्राहकाला दंड म्हणून दररोज 500 रुपये द्यावे लागतील. कार्ड बंद होईपर्यंत दररोज दंड आकारला जाईल. आरबीआयने क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्डसंदर्भात वरील सर्व नियम बदलले आहेत त्याचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो.