जाहिरात
मराठी बातम्या / मनी / किशोर बियानींचा फ्युचर ग्रूप Reliance कडे; 24,713 कोटींचं Big Bazaar डील

किशोर बियानींचा फ्युचर ग्रूप Reliance कडे; 24,713 कोटींचं Big Bazaar डील

किशोर बियानींचा फ्युचर ग्रूप Reliance कडे; 24,713 कोटींचं Big Bazaar डील

किशोर बियानी यांचा फ्यूचर ग्रूप (Future group) रिलायन्स (Reliance Retail Ventures Limited) घेणार आहे. Big Bazaar, FBB, Cetral, फूड हॉल, निलगिरीज, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट : रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रातली कंपनीने Reliance Retail Ventures Limited (RRVL)फ्यूचर ग्रूपचा रिटेल (Future group retail) आणि होलसेल व्यवसाय विकत घेणार असल्याचं शनिवारी जाहीर केलं. एके काळी भारताच्या रिटेल उद्योगाचे राजे म्हणवणारे किशोर बियानी (Kishore biyani) यांच्या फ्यूचर ग्रूपशी मुकेश अंबानींच्या ( Mukesh Ambani) रिलायन्सने 24,713 कोटी रुपयांचं डील केलं आहे. फ्यूचर ग्रूप रिलायन्समध्ये आल्यानंतर आता RIL देशातला सर्वांत मोठा रिटेल उद्योग ठरू शकतो. या नव्या करारामुळे देशभरातली 1800 फ्यूचर रिटेल स्टोअर्स रिलायन्सला मिळणार आहेत. सध्या रियायन्सची अमेझॉनशी सुरू असलेली ई कॉमर्सची स्पर्धा यामुळे आणखी तगडी होईल. रिलायन्सला या मोठ्या रिटेल डीलमुळे मोठा ग्राहकवर्ग मिळू शकतो. रिलायन्स आणि फ्यूचर ग्रूप दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे,  बिग बझार, फूड हॉल, निलगिरीज, FBB, Cetral, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येतील. ली कूपर आणि All हे कपड्यांचे ब्रँड सोडता इतर रिटेल आउटलेट RIL कडे येणार आहेत. रिलायन्स रिटेलकडे सध्या 11,784 स्टोअर्स आहेत. फॅशन, फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, प्रीमिअम फॅशन यापासून ते किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कनेक्टिव्हिटीपर्यंत सगळे उद्योग RIL च्या छत्राखाली आहेत. रिलायन्स रिटेलची गेल्या वर्षातली उलाढाल 1,63,000 कोटी रुपये एवढी होती. आता नव्या करारांमुळे आणि नव्या कंपन्या जोडल्या गेल्यामुळे यात मोठी वाढ होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात