मुंबई, 22 ऑक्टोबर : रिलायन्स इंडस्ट्रीजची (RIL) टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा स्वतंत्र निव्वळ नफा सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 3528 कोटी रुपये झाला आहे. यावर्षी जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3501 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे स्वतंत्र उत्पन्न 18735 कोटी रुपये होते. यापूर्वी जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 17,994 कोटी रुपये होते. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत जिओची Average Revenue Per Users (ARPU) 143.6 रुपये प्रति महिना होते. या तिमाहीत एकूण डेटा ट्रॅफिक दर तिमाहीच्या आधारावर 50.9 टक्क्यांनी वाढून 23 अब्ज जीबी झाला. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत जिओचे एकूण ग्राहक संख्या 429.5 कोटी होते. सप्टेंबर तिमाहीत 2.38 कोटी नवीन ग्राहक जोडले गेले आहे. Jio आणि Google JioPhone Next वर एकत्र काम करत आहेत. हा फोन दिवाळीपूर्वी लाँच होणार आहे. हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजला तब्बल 15,479 कोटींचा नफा रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीचे निकाल (RIL Q2 Result) जाहीर केले आहेत. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 13,680 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या म्हणजेच जून तिमाहीत कंपनीचा नफा (Reliance Industries Profit jumps) 12,273 कोटी रुपये होता. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 1.67 लाख कोटी रुपये होते. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 1.40 लाख कोटी रुपये होते. मागील वर्षीच्या तुलनेत मोठा नफा कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 46 टक्के वाढ झाली आहे. तिमाही आधारावर यात 12.1 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 10,602 कोटी रुपये होता. तर तिमाही आधारावर, याच आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा नफा 13,806 कोटी रुपये होता. IPO News : आजवरच्या सर्वात मोठ्या आयपीओला SEBI ची मंजुरी, Paytm 16600 कोटी उभे करणार रिलायन्स इंडस्ट्रीज लि. चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी यावेळी सांगितले की, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अतिशय दमदार आहे. कंपनीला भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थांमधील रिकव्हरीचा फायदा झाला आहे. आमच्या सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कोविड पूर्वीच्या पातळीपेक्षा वाढ दिसून आली आहे. कंपनीची ऑपरेशनल आणि आर्थिक कामगिरी कंपनीच्या रिटेल ऑईल अँड केमिकल आणि डिजिटल व्यवसायातील मजबूत वाढ दर्शवते. कंपनीला O2C व्यवसायाला सर्व उत्पादनांची जोरदार मागणी आणि हाय ट्रान्सपोर्टेशन फ्यूल मार्जिनमुळे फायदा झाला आहे. रिलायन्स रिटेलच्या व्यवसायात डिजिटल आणि फिजिकल दोन्ही प्लॅटफॉर्मच्या वाढीचा परिणाम दिसून आला आहे. यामुळे, कंपनीच्या रिटेल व्यवसायाची कमाई आणि मार्जिन दोन्हीमध्ये वाढ झाली आहे, मुकेश अंबानी यांनी म्हटलं. मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, रिलायन्स जिओ भारताच्या ब्रॉड बँड मार्केटच्या परिवर्तनाची मुख्य कारण आहे. पुढे जाऊन ही इंडट्री नवीन मापदंड निश्चित करेल. सरकारी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी योजना; दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा, कसा? कंपनीची मार्केट कॅप सुमारे 18.3 लाख कोटींवर महत्त्वाची बाब म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी कंपनीचे शेअर 2,750 रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले. कंपनीचे मार्केट कॅप 18 लाख कोटींवर पोहोचले होते. कंपनीने अलीकडेच सौर उर्जेसाठी अनेक करार केले आहेत. जुलैपासून स्टॉक 24 टक्क्यांनी वाढला आहे आणि कंपनीची मार्केट कॅप सुमारे 18.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.