मुंबई, 22 ऑक्टोबर : अनेक सरकारी योजना (Government Scheme) असतात पण त्याबद्दल सर्वसामन्यांना माहिती नसते. अशा काही योजना आहेत त्याबद्दल आज माहिती घेऊया. जर तुमचं सरकारी बँकेत खातं (Government Bank) असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल. वास्तविक, बँक आपल्या ग्राहकांना अनेक फायदे (Benefits From Government Scheme) देत असतात, मात्र त्यांची सर्वांना माहिती नसते. सरकारी बँकेत तुमचं खातं दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. काय आहे 4 लाख रुपयांची ही सुविधा 4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये फक्त 342 रुपये वार्षिक जमा करावे लागतात. जन धन खातेधारकांना 2 लाखांचा लाभ विनामूल्य जन धन ग्राहकांना बँकेकडून ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा पुरवत आहे. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट फक्त 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर PMJJBY मार्फत 2 लाखांचा लाभ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक हफ्ता 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला जीवन विमा संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते पंतप्रधान सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अत्यंत कमी प्रीमियमवर विमा पुरवते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. New IPO : Nykaa कंपनीचा आयपीओ ‘या’ दिवशी खुला होणार; जाणून घ्या कंपनीबद्दल सर्वकाही अटल पेन्शन योजना कमी गुंतवणुकीवर पेन्शनच्या हमीसाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेमध्ये 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.