मुंबई, 10 ऑक्टोबर: रिलायन्स न्यू एनर्जी सोलर (Reliance New Energy Solar) ने रविवारी 10 ऑक्टोबर रोजी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी 5792 कोटी रुपयांमध्ये (771 मिलियन डॉलर) आरईसी सोलर होल्डिंग्जचे (REC Solar Holdings) अधिग्रहण केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची संपूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेड कडून आरईसी सोलर होल्डिंग्ज एएस (आरईसी ग्रुप) ची 100 टक्के भागीदारी घेण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने बीएसई फाईलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
रिलायन्सच्या न्यू एनर्जी व्हिजनसाठी जागतिक स्तरावर फोटोव्होल्टिक (PV) मॅन्युफॅक्चरिंग प्लेअर होण्यासाठी हे अधिग्रहण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे अधिग्रहण रिलायन्स समूहासाठी 2030 पर्यंत 100 GW सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या वर्षापर्यंत भारताने 450 गिगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
हे वाचा-Rakesh Jhunjhunwala यांच्या पसंतीचा 86 रुपयांचा स्टॉक देईल मोठा रिटर्न,वाचा कारण
नॉर्वे मुख्यालय REC ची स्थापना 1996 मध्ये झाली. त्याचे कार्यरत मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया पॅसिफिकमध्ये याची प्रादेशिक केंद्रे देखील आहेत. कंपनीकडे 600 हून अधिक युटिलिटी आणि डिझाईन पेटंट आहेत, त्यापैकी 446 मंजूर झाले आहेत. आरईसी ही प्रामुख्याने संशोधन आणि विकास फोकस कंपनी आहे.
रिलायन्सने जामनगरच्या धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्समधील सिलिकॉन-टू-पीव्ही-पॅनल गीगाफॅक्टरीमध्ये आरईसी सोलरचे तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखली आहे. त्याची सुरुवात दरवर्षी 4GW च्या क्षमतेने होईल. हे कालांतराने 10GW प्रति वर्ष क्षमतेपर्यंत वाढवले जाईल, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
डिस्क्लेमर- नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 कंपन्या चॅनेल/वेबसाइटचे संचालन करतात, ज्याचे नियंत्रण स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited