Home /News /money /

Reliance ची फॅशन वर्ल्डमधील मोठ्या ब्रँडसोबत हातमिळवणी, 'या' कंपनीती 51 टक्के भागभांडवल खरेदी करणार

Reliance ची फॅशन वर्ल्डमधील मोठ्या ब्रँडसोबत हातमिळवणी, 'या' कंपनीती 51 टक्के भागभांडवल खरेदी करणार

अबू जानी आणि संदीप खोसला ही फॅशन वर्ल्डमधील दिग्गज नावं आहेत. रिलायन्सनं आता त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही भागीदारी काय कमाल करेल, हे येत्या काही दिवसांत बघायला मिळू शकेल.

मुंबई, 20 एप्रिल : 'रिलायन्स'(Reliance) या नावानं जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली उपस्थिती निर्माण केली आहे. टेलिकम्युनिकेशन, ग्रोसरी, फ्युएल, मीडिया यासारख्या अनेक सेक्टरमध्ये रिलायन्सची यशस्वी वाटचाल सुरू आहे. काही वर्षांपूर्वी रिलायन्सनं आपल्या 'आजिओ' (Ajio) या ब्रँडच्या माध्यमातून फॅशन इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) अवघ्या वर्षभरात तिसर्‍या दिग्गज फॅशन ब्रँडमध्ये (Fashion Brand) मोठी गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. आरआयएलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडनं (RBL) मंगळवारी सांगितलं की, रिलायन्स लवकरच फॅशन हाऊस अबू जानी संदीप खोसला (AJSK) या कंपनीमधील 51 टक्के भागभांडवल खरेदी करणार आहे. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, आरबीएलनं स्वतःहून किंवा तिच्या उपकंपनीद्वारे एजेएसकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करारावर सही केली आहे. कराराची रक्कम अद्याप उघड करण्यात आलेली नाही. एजेएसकेमध्ये रिलायन्सचा 51 टक्के हिस्सा असूनही अबू जानी (Abu Jani) आणि संदीप खोसला (Sandeep Khosla) हेच ब्रँडचा डिझाईन आणि क्रिएटिव्ह विभाग पाहतील. तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा एका वर्षात खरेदी केला तिसरा फॅशन ब्रँड रिलायन्सनं आता फॅशन क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी कंपनी होण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी अवघ्या वर्षभरात कंपनीनं देशातील तीन दिग्गज फॅशन ब्रँड्सचं भागभांडवल (Shares) विकत घेतलं आहे. गेल्या वर्षी रिलायन्सनं फॅशन वर्ल्डमधील सुप्रसिद्ध चेहरा असलेल्या 'मनीष मल्होत्रा'च्या (Manish Malhotra) ब्रँडमध्ये गुंतवणूक केली होती. तर, ऑक्टोबर 2021 मध्ये रिलायन्स रिटेलनं फॅशन डिझायनर रितू कुमारची (Ritu Kumar) कंपनी असलेल्या 'रितिका प्रायव्हेट लिमिटेड'चा 52 टक्के हिस्सा खरेदी केला होता. इतकंच नाही तर नवीन फॅशन लेबल तयार करण्यासाठी कंपनीनं 2022 च्या सुरुवातीला फॅशन डिझायनर (Fashion Designer) राहुल मिश्रासोबतही (Rahul Mishra) भागीदारी केली होती. एजेएसकेचे तीन फॅशन लेबल आहेत प्रसिद्ध अबू जानी आणि संदीप खोसला यांचा ब्रँड आधुनिकता आणि गुणवत्तेसाठी ओळखला जातो. त्यांच्या एएसएएल, गुलाबो आणि मर्द या तीन फॅशन लेबलनं (Fashion Lable) जगभरात खूप नाव कमावलं आहे. एएसएएल (ASAL) या लेबलअंतर्गत महिलांसाठी वेडिंग ड्रेसेस (Wedding Dresses) सादर केले जातात तर गुलाबो (Gulabo) हे लेबल महिलांच्या फॉर्मल वेअर्ससाठी प्रसिद्ध आहे. मर्द (Mard) या लेबलच्या माध्यमातून पुरुषांचे फॉर्मल आणि वेडिंग ड्रेसेस सादर केले जातात. रेल्वे तिकीट बुकिंग व्यतिरिक्त IRCTC च्या इतर सुविधांबद्दल माहितीये का? चेक करा डिटेल्स जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल भारतीय कला रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी (Isha Ambani) म्हणाल्या, ‘जवळपास तीन दशकांपासून भारतात त्यांचे फॅशन कौशल्य प्रदर्शित करणाऱ्या दिग्गजांसोबत भागीदारी करताना मला आनंद होत आहे. या भागीदारीद्वारे जुन्या ब्रँडला नवीन व्यासपीठ मिळेल आणि आम्ही भारतीय कला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊ शकू.’ रिलायन्ससोबतच्या भागीदारीबद्दल अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'गेल्या 35 वर्षांपासून आम्ही भारतीय संस्कृतीशी (Indian Culture) संबंधित फॅशन लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आता रिलायन्समध्ये सहभागी होऊन आमचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आणखी व्यापकपणे पूर्ण होईल. आता फॅशनच्या रूपात भारतीय कला (Indian Art) आणि संस्कृती संपूर्ण जगासमोर नेली जाईल.' अबू जानी आणि संदीप खोसला ही फॅशन वर्ल्डमधील दिग्गज नावं आहेत. रिलायन्सनं आता त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही भागीदारी काय कमाल करेल, हे येत्या काही दिवसांत बघायला मिळू शकेल.
First published:

Tags: Fashion, Reliance, Reliance group

पुढील बातम्या