Home /News /technology /

तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम सक्रिय आहेत हे शोधण्यासाठी सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. त्याचे नाव टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : आधार कार्ड (Aadhar Card) आता प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या (Aadhar Card Fraud) घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: दुसऱ्याच्या आधार कार्डावर सिम कार्ड (Sim Card) देण्याच्या बाबतीत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची आधारशी संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नका हे महत्त्वाचे आहे. मोबाईल सिम कार्ड खरेदी करण्यासाठी, तुम्हाला तुमचे वैध आधार कार्ड दाखवावे लागेल आणि त्यानंतरच तुमच्या नावाने सिम जारी केले जाईल. दरम्यान मोबाईल सिम दुसऱ्याच्या आधारकार्डवर अज्ञात व्यक्तीला देऊन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. आर्थिक आणि इतर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार इतरांच्या आधारे जारी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. म्हणूनच तुमच्या आधार कार्ड क्रमांकाचा कोणी गैरवापर करत आहे की नाही हे तपासत राहणे गरजेचे आहे. आता तुमच्या आधारशी किती मोबाईल सिम लिंक आहेत हे शोधणे अगदी सोपे आहे. वर्क फ्रॉम होम सोपं करणारी ही विशेष गॅजेट्स तुमच्याकडे आहेत का? किंमतीपासून फिचर्सपर्यंत जाणून घ्या तुम्ही काही मिनिटांत तुमच्या फोनवर ते तपासू शकता. तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम सक्रिय आहेत हे शोधण्यासाठी सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. त्याचे नाव टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे आहे. या पोर्टलद्वारे, वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात. या वेबसाइटवर, तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरची माहिती तर मिळणार, पण तुमच्या नकळत तुमच्या आधारवर कोणताही मोबाइल क्रमांक जारी झाला असेल, तर तुम्ही तेथे तक्रारही करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही तुमचे जुने नंबर आधारवरून अनलिंक करू शकता, जे तुम्ही आता वापरत नाही. भन्नाट अविष्कार! गावातील प्रत्येक घर फक्त 50 हजार रुपयांमध्ये होईल प्रकाशित आधारबाबतची माहिती कशी शोधायची? >> सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये 'https://tafcop.dgtelecom.gov.in/' वेबसाइट उघडा. >> वेबसाइट उघडल्यानंतर, दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा मोबाइल नंबर टाका. >> नंतर 'OTP Request' बटणावर क्लिक करा. >> तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि नंतर 'Validate' वर क्लिक करा. >> यानंतर, तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व मोबाइल नंबर वेबसाइटवर दिसतील. >> येथे तुम्ही वापरात नसलेल्या किंवा यापुढे आवश्यक नसलेल्या नंबरची तक्रार करू शकता आणि ब्लॉक करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, Online fraud, Sim

    पुढील बातम्या