Home /News /money /

रेल्वे तिकीट बुकिंग व्यतिरिक्त IRCTC च्या इतर सुविधांबद्दल माहितीये का? चेक करा डिटेल्स

रेल्वे तिकीट बुकिंग व्यतिरिक्त IRCTC च्या इतर सुविधांबद्दल माहितीये का? चेक करा डिटेल्स

Indian Railway Catering and Tourism Corporation

Indian Railway Catering and Tourism Corporation

रेल्वे तिकीट बुक करण्याव्यतिरिक्त, IRCTC अॅपवर इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. या सुविधांबद्दल जाणून घेऊया.

  मुंबई, 20 एप्रिल : रेल्वेचे तिकीट बुक (Railway Ticket Booking) करायचे असेल तर तुम्ही IRCTC अॅपद्वारे तिकीट बुक करू शकता. IRCTC अॅपवर तिकीट बुक करणे सर्वात सोपे आहे. तुम्ही तुमच्या घरातून, ऑफिसमधून किंवा कुठूनही अॅपद्वारे काही मिनिटांत तुमचे ट्रेन तिकीट बुक करू शकता. सोप्या भाषेत सांगायचे काही मिनिटात तु्म्हाला मोबाईलवर तिकीट बुक करता येते. रेल्वे तिकीट बुक करण्याव्यतिरिक्त, IRCTC अॅपवर इतरही अनेक सुविधा ( IRCTC Services) उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. या सुविधांबद्दल जाणून घेऊया. IRCTC वेबसाइटवर उपलब्ध सेवा >> जर तुम्ही रेल्वे पास वापरत असाल तर त्यावरही विशेष सवलत आहे. >> येथे तुम्ही तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. >> IRCTC वेबसाइटवर तिकीट बुक केल्यावर, प्रवाशांना दिव्यांग कोट्यावर विशेष सवलत मिळते. >> तुम्हाला तुमच्या रुटची ट्रेन आणि त्यामध्ये असलेल्या सीटची माहिती आधीच मिळेल. >> तुम्ही तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या तारखांना आरक्षणाची उपलब्धता तपासू शकता.

  तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

  IRCTC वेबसाइटवर अकाऊंट कसं सुरु करायचं? >> सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट irctc.co.in वर जा. >> जर तुम्ही नवीन खाते तयार करत असाल तर Register पर्यायावर क्लिक करा. >> त्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल. तुम्ही हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. >> तुमचे नाव, यूजर नेम, लिंग, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा आणि सबमिट बटण दाबा. >> तुमचे IRCTC खाते तयार झाल्यावर ते तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पाठवले जाईल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Indian railway, IRCTC

  पुढील बातम्या