Home /News /money /

JIO च्या या 2 घोषणांमुळे आपल्या रोजच्या जगण्यावर पडणार थेट प्रभाव

JIO च्या या 2 घोषणांमुळे आपल्या रोजच्या जगण्यावर पडणार थेट प्रभाव

रिलायन्सची AGM फक्त वित्तव्यवसायातल्या लोकांसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी लक्षवेधी ठरली. कारण त्यातल्या 2 घोषणा आपल्या रोजच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या ठरू शकतात.

    मुंबई, 15 जुलै : Reliance Industries Limited (RIL)ची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)लक्षवेधी ठरली. फक्त वित्तव्यवसाय किंवा अर्थसत्तेतल्या लोकांसाठी नाही तर सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 2 महत्त्वाच्या घोषणा या RIL AGM मध्ये करण्यात आल्या. मुकेश अंबांनींनी आत्मनिर्भर 5G ची घोषणा केल्यामुळे आता भारतातून 2G लवकरच हद्दपार होईल. त्यामुळे रडत-खडत डाउनलोड होणारा डेटा आता कालबाह्य होईल. आपल्या हातातल्या मोबाईलचा स्पीड वाढणार हे निश्चित. दुसरा फरक पडेल आपल्या रोजच्या किराणा आणि भाजी आणण्याच्या सवयींवर. JioMart या नव्या ई कॉमर्स व्यवसायाची मोठी घोषणाही आज झाली. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (JPL)मध्ये Google ने गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता Google च्या मदतीने स्वस्तात 4G आणि 5G फोन जिओ भारतीय बाजारात आणणार आहे. संबंधित - रिलायन्सकडून मोठी बातमी! फेसबुकनंतर Google करणार JIO मध्ये मोठी गुंतवणूक यापूर्वी Facebook नेही जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता Whatsapp च्या माध्यमातून Jio Mart ला जोडण्याचं काम सुरू झालं आहे. यामुळे आपल्या किराणा दुकानांचा आणि किराणा खरेदीचा अनुभव बदलू शकतो. जिओ मार्टच्या माध्यमातून किराणा सामानाबरोबरच इकेक्ट्रॉनिक्स, फॅशन, औषधं आणि आरोग्यविषयक सेवा पुरवण्याचा विचार मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवला. वाचा - Jioने सादर केला जादूचा चष्मा! JioGlass वापरून मिळणार थेट भेटीचा 3D अनुभव 200 शहरांमध्ये किराणा दुकानदारांना एकत्र करून जिओ मार्टच्या माध्यमातून ऑनलाईन किराणा दुकान चालवण्याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आता जिओ मार्ट अधिकृतपणे लाँच झालं आहे. याची घोषणा रियायन्सच्या AGM मध्ये करण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच रियायन्सने अशा प्रकारे ऑनलाईन AGM घेतली. Coronavirus च्या साथीच्या धोक्यामुळे सर्व भागीदारांनी आपापल्या घरातूनच लॉगइन केलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Google, RIL

    पुढील बातम्या