मुंबई, 18 जून : हल्ली प्रत्येक जणच गुंतवणूक करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की स्त्री आणि पुरुष पैसे, गुंतवणूक याबद्दल वेगवेगळे विचार करत असतात. फायनॅन्शियल एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, एक सर्वे केला गेला. त्यात ही गोष्ट समोर आलीय की स्त्रियांवर गुंतवणुकीसंबंधी प्रभाव वडिलांपेक्षा पतीचा जास्त असतो. DSP विनवेस्टर इनिशिएटिव पल्स 2019नं सर्वे केला. यात स्त्रियांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणं हाही उद्देश होता. या सर्वेत अनेक प्रश्न विचारले गेले. स्त्री गुंतवणुकीचा निर्णय कसा घेते? गुंतवणुकीच्या बाबतीत स्त्री कसं पाहते? स्त्रियांचे टाॅप मनी गोल्स काय आहेत? स्त्री गुंतवणुकीचे निर्णय कसे घेते? स्त्री-पुरुषात काय फरक असतो का? पालक आपल्या मुलांना गुंतवणुकीबद्दल कसं प्रोत्साहन देतात? बँकांमध्ये नोकरीची मोठी संधी, ‘असा’ करा अर्ज सर्वेक्षणातून काय आलं समोर? या सर्वेनुसार फक्त 33 टक्के स्त्रिया स्वतंत्ररित्या गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकतात.तर गुंतवणुकीचा निर्णय घेणारे पुरुष आहेत 64 टक्के. राज्याच्या अर्थसंकल्पातल्या 10 मुख्य गोष्टी ज्या महिला स्वतंत्रपणे गुंतवणूक करतात त्यांच्यापैकी 33 टक्के आपल्या पतीमुळे आणि 24 टक्के आईवडिलांमुळे करतात. 13 टक्के स्त्रियांनी सांगितलं की पतीचा मृत्यू किंवा घटस्फोट यामुळे त्यांना गुंतवणूक करण्याचे निर्णय घ्यावे लागले. ‘या’ बँकांमधल्या तुमच्या पैशावर आता मिळणार कमी व्याज फक्त 30 टक्के स्त्रियांनी त्या त्यांच्या मर्जीनं गुंतवणूक करतात, असं सांगितलं. पण बाकीच्या स्त्रिया गुंतवणूक करतात त्यातल्या 40 टक्के पतीमुळे आणि 24 टक्के पालकांमुळे करतात. जे पुरुष गुंतवणूक करतात त्यातल्या 40 टक्के पुरुषांना गुंतवणुकीची माहिती वडिलांकडून मिळते तर 36 टक्के पुरुषांना त्यांच्या मित्रांकडून गुंतवणुकीची माहिती मिळते. VIDEO : एकदा ऐकाच वाहतूक पोलिसाचं रॅप साँग, ‘तेरा टाईम आयेंगा’!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







