Home /News /money /

'या' बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता कमी होणार तुमचा EMI

'या' बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता कमी होणार तुमचा EMI

खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असणाऱ्या आरबीएल बँकेने (RBL Bank) ग्राहकांना मोठा दिलासा देत व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली, 23 जुलै : खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असणाऱ्या आरबीएल बँकेने (RBL Bank) ग्राहकांना मोठा दिलासा देत व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्व कालावधीच्या कर्जावरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी केला आहे. नवीन दर 22 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 22 मे रोजी रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची कपात करून दर 4 टक्के केले होते. यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक यांनी रेपो आणि एमसीएलआर संबंधित त्यांचे कर्जावरील दर आधीच कमी केले आहेत. (हे वाचा-पेन्शन आणि इन्शूरन्स सेवा देण्याच्या तयारीत WhatsApp, लवकरच होणार निर्णय) 1 ऑगस्टपासून बदलणार RBL बचत खात्याचे नियम आरबीएलने नुकताच बचत खात्यावरील व्याजदरामध्ये बदल केला आहे. नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आता बचत खात्यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असल्यास 4.75 टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. ते 1 ते 10 लाखांपर्यंतची शिल्लक रक्कम असल्यास 6 टक्के आणि 10 लाख ते 50 कोटी रुपयांची शिल्लक खात्यामध्ये असल्यास 6.75 टक्के व्याज मिळेल. RBL कडून अन्य शुल्कांमध्येही बदल डेबिट कार्ड हरवल्यास किंवा डॅमेज झाल्यास 200 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. त्याचप्रमाणे आता टायटेनियम डेबिट कार्डासाछी वार्षिक 250 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे ग्राहक आता एका महिन्यात एटीएमच्या माध्यमातून 5 वेळा विनाशुल्क रक्कम काढू शकतात. (हे वाचा-केवळ 1 रुपयात कुठे आणि कसं खरेदी कराल 24 कॅरेट सोने, वाचा सविस्तर) दरम्यान देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्य स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of Inida)कर्जामधील प्रमुख व्याजदर एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ज्यानंतर आता गृहकर्ज स्वस्त झाले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rbl bank

    पुढील बातम्या