जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 2000 Rupees Note : 2 हजारांची नोट चलनातून बाहेर, आरबीआयचा मोठा निर्णय

2000 Rupees Note : 2 हजारांची नोट चलनातून बाहेर, आरबीआयचा मोठा निर्णय

दोन हजारच्या नोटाही बंद होणार

दोन हजारच्या नोटाही बंद होणार

2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मे : 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. 2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली. 2018-19 सालीच आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. मार्च 2017 पर्यंत दोन हजार रुपयांच्या 89 टक्के नोटा चलनात होत्या, 31 मार्च 2018 ला ज्याची एकूण किंमत 6.73 लाख कोटी रुपये होती. 31 मार्च 2023 ला हीच रक्कम 3.62 लाख कोटी एवढी झाली, जी 10.8 टक्के होती. 23 मे 2023 पासून नागरिकांना बँकेमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत, एकावेळी नागरिकांना 20 हजार रुपयांपर्यंतच्याच 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. तसंच बँकांनी आतापासूनच 2 हजार रुपयांच्या नोटा देणं बंद करावं, असे आदेशही आरबीआयने केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , Money18 , rbi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात