आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. म्हणजे आता यापुढे ही नोट छापली जाणार नाही. 2016 साली मोदी सरकारने 500, 1000 च्या नोटा बंद केल्यानंतर ही नोट चलनात आली. पण 2019 पासून आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटेची छपाईच बंद केली आहे. पण पण याचा अर्थ तुमच्याकडे असलेली नोट बाद नाही, ती चलनात आहे. व्यवहारात तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण फक्त 30 सप्टेंबरपर्यंत. 30 सप्टेंबरपर्यंत ही नोट तुम्ही बँकेत बदलून घेऊ शकता. यामुळे तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.