मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता डॉलरपुढे रुपया झुकणार नाही, तर ताठ मानेने उभा राहणार! असा आहे RBI चा प्लान

आता डॉलरपुढे रुपया झुकणार नाही, तर ताठ मानेने उभा राहणार! असा आहे RBI चा प्लान

डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने रिझर्व्ह बँकेने व्यापार आघाडीवर अमेरिकन नियमाला आव्हान देण्यासाठी कंबर कसली आहे. आरबीआय लवकरच अशी प्रणाली बनवणार आहे, ज्यानंतर जागतिक बाजारपेठेतील व्यवहारांसाठी डॉलरऐवजी रुपयाचा वापर होईल.

नवी दिल्ली, 12 जुलै : रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात होताच भारतीय चलनावर (Indian currency) अमेरिकी डॉलरचा (US Dollars) दबाव वाढू लागला. जागतिक बाजारपेठेतल्या सर्व निर्बंधानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) एक नवीन प्रणाली विकसित करत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार रुपया या भारतीय चलनात करण्यासाठी नवीन प्रणाली (System) तयार करण्यात येत असल्याचं `आरबीआय`नं सांगितलं आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाची सातत्याने होत असलेली घसरण आणि जगाचा रुपयाकडे वाढता कल बघता एक नवीन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यानंतर भारत आपले आयात-निर्यातीचे व्यवहार (Import-Export Transactions) रुपयात करु शकेल आणि जागतिक व्यापार व्यवस्थेतला डॉलर आणि अमेरिकेचा दबाव संपुष्टात येईल.

आता निर्बंधांचा होणार नाही कोणताही परिणाम

`आरबीआय`ची नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर अमेरिकेसह अन्य पाश्चात्य देशांच्या निर्बंधांचा भारतावर असलेला प्रभाव संपुष्टात येईल. अमेरिकेनं कोणत्याही देशावर निर्बंध लादले तर त्याचा फटका भारताला सहन करावा लागतो. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. तणाव निर्माण झाल्याने अमेरिकेनं इराणवर (Iran) निर्बंध लादले. तेव्हा भारताला इराणकडून कच्चं तेल खरेदी करणं कठीण झालं होतं. त्याचप्रमाणे, नुकत्याच झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका, युरोपने रशियावर निर्बंध लादले तेव्हा भारतीय कंपन्या रशियन उत्पादने खरेदी करण्यात अपयशी ठरल्या. जागतिक बाजारपेठेत व्यापाराचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. पण निर्बंधांमुळे अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार बंद झाले. त्यामुळे या निर्बंधांचा भारतावर सर्वाधिक परिणाम झाला. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आरबीआय जागतिक बाजारपेठेत थेट रुपयामध्ये व्यवहार करण्याची प्रणाली तयार करत आहे.

RBIची तीन बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई, तुमचं 'या' बँकांमध्ये खातं आहे का?

फॉरेक्स मार्केटच्या माध्यमातून ठरवले जाणार दर

फॉरेन एक्स्चेंज मॅनजमेंट अ‍ॅक्ट अर्थात फेमा (FEMA) अंतर्गत ही नवीन प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीच्या मदतीनं परदेशात होणारे आयात-निर्यातीच्या सर्व सेटलमेंट (Settlement) रुपयात होतील. संबंधित देशाच्या चलनाच्या ग्लोबल फॉरेक्स मार्केटमध्ये (Global Forex Market) सुरु असलेल्या किमतीच्या आधारे रुपयाची किंमत ठरवली जाईल आणि सौद्यांची सेटलमेंट भारतीय चलनातच केली जाईल, असं `आरबीआय`नं सांगितलं.

विशेष अकाउंट सुरु करणार

`आरबीआय`ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रणाली लागू करण्यासाठी, भारतातल्या अधिकृत बँकांना व्होस्ट्रो अकाउंट (Vostro Account) उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतातील अधिकृत बॅंका व्यापाराशी संबंधित देशांमधील बॅंकांसोबत रुपयाचं व्होस्ट्रो अकाउंट उघडू शकतील. यामुळे भारतीय आयातदार आणि परदेशी पुरवठादारांची सेटलमेंट रुपयात होईल. त्याचप्रमाणे, संबंधित देशांच्या बॅंकांनी उघडलेल्या विशेष व्होस्ट्रो अकाउंटमधून भारतीय निर्यातदारांना देयकं दिली जातील.

First published:

Tags: Economy, Rbi