मराठी बातम्या /बातम्या /मनी /नवीन घर घेतलं आहे किंवा घेणार असाल तर 10 वाजताच्या 10 गोष्टी तुमच्यावर मोठा परिणाम करतील

नवीन घर घेतलं आहे किंवा घेणार असाल तर 10 वाजताच्या 10 गोष्टी तुमच्यावर मोठा परिणाम करतील

रिझर्व्ह बँक

रिझर्व्ह बँक

RBI ने पुन्हा एकदा रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला. RBI ने 0.25 बेसिस पॉईंट्सने व्याजदरात वाढ केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : जागतिक स्तरावर अत्यंत वाईट परिस्थिती सध्या आहे. आर्थिक मंदीचं सावट आहे मात्र भारतातील स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. महागाईवर अंशत: नियंत्रण मिळवण्यात यशही आलं आहे. US फेड बँकेनं व्याजदरात वाढ केल्यानंतर RBI ने पुन्हा एकदा रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला. RBI ने 0.25 बेसिस पॉईंट्सने व्याजदरात वाढ केली आहे.

या दरवाढीमुळे लोन घेणाऱ्यांवर किंवा घेतलेल्या किंवा त्यासाठी प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या रेपो रेट वाढण्यामुळे आता बँकेतील कर्ज आणि EMI चा बोजा दोन्ही वाढणार आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 10 वाजता केलेल्या घोषणेचा परिणाम तुमच्या आयुष्यातील 10 गोष्टींवर होणार आहे.

1. होम, कार, पर्सनल लोन महाग होणार, तुमच्यावर EMI चा बोजा वाढणार त्यामुळे तुमचं घरातील बजेट बिघडू शकतं. तुम्ही अधिकचा EMI भरण्याचा प्लॅन करत असाल तर तोही बिघडण्याची शक्यता आहे.

2 तुमचा EMI 319 रुपयांनी तर एकूण EMI वरील व्याज 77000 रुपयांनी लोनवर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.

Loan घेताय थांबा! Flat lendingआणि Reducing Interest Rate मधील फरक समजून घ्या

3. स्टेट बँक ऑफ इंडिया ८.६ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. आपण 20 वर्षांसाठी त्याच दराने 20 लाखांचे कर्ज घेतले असं समजू या, दर वाढल्यानंतर, तुम्हाला दर महिन्याचा EMI 17483 रुपये भरावा लागत होता तो आता 17802 रुपये भरावा लागेल. म्हणजे तुमच्या EMI मध्ये 319 रुपयांनी वाढ झाली.

4. एकूण तुम्ही घेतलेलं कर्ज 21.95 लाख रुपये होते. आता त्यावर तुम्ही आधी तेवढीच रक्कम भरणार होतात मात्र आता तुम्हाला वाढलेल्या व्याजदरानुसार 22.72 लाख रक्कम भरावी लागेल. म्हणजे 77000 रुपये जास्त व्याजदर भरावं लागेल.

5. हीच रक्कम तुम्ही 50 लाख केली तर तुमचा EMI वाढेल आणि तुम्हाला 797 रुपये जास्त रक्कम तुमच्या आताच्या चालू EMI वर अधिक भरावी लागेल. म्हणजेच एकूण लोनवर तुम्हाला 1.92 लाख रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

तुमचं HDFC बँकेंत अकाउंट आहे? मग हे बदल वाचाच

6. तुम्ही जर लोनचा हप्ता चुकवला तर तुमच्यावर पेनल्टी लागते. ही पेनल्टीची रक्कम मोठी असते. त्यामुळे थेट तुमचं बजेट कोलमडणारा हा निर्णय आहे. त्यामुळे आताच परफेक्ट प्लॅनिंग करणं आवश्यक आहे.

7. तुम्ही जर कुठलं लोन घेतलं असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आधी करणं आवश्यक आहे. वाढलेलं व्याजदर तुमचा खिसा रिकामा करणारे आहेत.

8. तुम्ही तुमचा ५ टक्के EMI लवकर भरून लोन लवकर कसं पूर्ण करता येईल यावर अधिक भर देणं आवश्यक आहे.

9. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, EMI किंवा हप्त्याची रक्कम एका महिन्यापर्यंत चुकल्यास, EMI रकमेसह वार्षिक 2% दराने दंडावर व्याज आकारले जाईल.

१०. पुढील तीन महिन्यात व्याजदर वाढणार की नाही याबाबत कोणतेही संकेत RBI ने दिले नाहीत. त्यामुळे तुम्ही पैसे खर्च करण्याऐवजी अधिक साठवून ठेवा आणखी व्याजदर वाढलं तर तुमचं बजेट पुरतं कोलमडण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: EMI, Rbi, Rbi latest news