RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयापूर्वीच खाजगी क्षेत्रातील बँक HDFC ने मार्जिंनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) वाढवले आहे.
2/ 5
बँकेचे हे वाढलेले दर 7 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटवर MCLR दर अपडेट करण्यात आला आहे.
3/ 5
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) वाढ केली आहे. आता ओवरनाइट MCLR रेट 8.60 टक्के झाला आहे. एका महिन्यासाठी MCLR 8.60 टक्के, तीन महिन्यांसाठी 8.65 टक्के, सहा महिन्यांसाठी 8.75 टक्के झाला आहे.
4/ 5
एका वर्षासाठी MCLR 8.90 टक्के करण्यात आला आहे. जो पूर्वी 8.85 टक्के होता. त्याच वेळी, दोन वर्षांसाठी MCLR 9 टक्के आणि तीन वर्षांसाठी MCLR 9.10 टक्के आहे.
5/ 5
MCLR म्हणजे काय? : मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट किंवा MCLR हा किमान व्याजदर आहे. ज्यावर फाइनेंशियल इंस्टीट्यूट एखाद्याला कर्ज देतात. यापेक्षा कमी व्याजावर कोणतीही बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. हा दर मध्यवर्ती बँकेने लागू केला आहे.