रिलायन्स रिटेलला 1.75 टक्के समभागांसाठी Silver lake कडून मिळाले 7500 कोटी

रिलायन्स रिटेलला 1.75 टक्के समभागांसाठी Silver lake कडून मिळाले 7500 कोटी

9 सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडमध्ये (RRVL) सिल्व्हर लेक 1.75 टक्क्यांची भागीदारी 7,500 कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) शनिवारी सांगितले की कंपनीत सिल्व्हर लेक पार्टनर्सने (Silver Lake Partners) 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील या खासगी इक्विटी कंपनीने (SLP) रिलायन्स रिटेलमध्ये 1.75 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. 9 सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडमध्ये (RRVL) सिल्व्हर लेक 1.75 टक्क्यांची भागीदारी 7,500 कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते.

शनिवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने नियामक फाइलिंगमध्ये (Exchange Filing) सांगितले की, "रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडला सिल्व्हर लेक पार्टनर्सकडून 7,500 कोटी रुपयांची सब्सक्रिप्शन अमाउंट मिळाली आहे." इक्विटी भागीदारी दिल्यानंतर एसएलपी रेनबो होल्डिंगची (SLP Rainbow Holdings) RRVL मध्ये एकूण 1.75 टक्के इक्विटी शेअर कॅपिटल आहे. सिल्व्हर लेकच्या या गुंवणुकीनंतर RRVL चे Pre-Equity मूल्य 4.21 लाख झाले आहे.

सिल्व्हर लेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे

यासह, सिल्व्हर लेकद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दुसऱ्या सहाय्यक कंपनीत गुंतवणूक करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीने 2020 मध्येच रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 10,202.55 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करणार्‍या फेसबुकनंतर सिल्वर लेक ही अमेरिकेची दुसरी कंपनी बनली. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये, सिल्व्हर लेकने दोन वेळा एकूण 2.08 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. याआधी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने (Facebook) जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 9.99 टक्के गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.

दोन कोटी व्यापाऱ्यांना फायदा होणार

कंपनीने शनिवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “या नवीन रणनीतीनुसार आता कंपनी छोट्या व असंघटित व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे डिजिटायझेशन करीत आहे आणि हे नेटवर्क सुमारे 2 कोटी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या