मुंबई : महागाई वाढत असताना मात्र RBI ने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आता EMI चा बोजा वाढणार नाही अशी आशा सर्वसामान्य लोकांना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीत जाहीर केले. समितीतील 3 सदस्यांपैकी 3 सदस्य आरबीआयचे आणि 3 सदस्य बाहेरील आहेत RBI ने सात वेळा व्याजदर वाढवले आहेत. आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार MPC मध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे रेपो रेट 6.5 टक्के कायम असणार आहे. फेब्रुवारीच्या बैठकीत आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने व्याजदरात २५ आधार अंकांची वाढ केली होती. यानंतर रेपो दर 6.25% वरून 6.50% झाला.
Monetary Policy Statement by Shri Shaktikanta Das, RBI Governor - June 08, 2023 https://t.co/R9mQDcr70D
— ReserveBankOfIndia (@RBI) June 8, 2023
या दरम्यान, रिव्हर्स रेपो दर 3.35% होता. याशिवाय, स्थायी सुविधा दर 6.25% आणि मार्जिन स्थायी सुविधा दर 6.75% आहे. RBI चा बँक दर 6.75% आणि रोख राखीव प्रमाण म्हणजेच CRR 4.50% होता. SLR 18% वर होता. एप्रिलच्या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.